घरफोडी, वाहनचोरी करणारे अटकेत
By admin | Published: May 30, 2017 03:07 AM2017-05-30T03:07:04+5:302017-05-30T03:07:04+5:30
रात्रीच्या वेळेस घरफोड्या करणे, वाहन व पेट्रोलचोरी करणे अशा घटनांनी पोलिसांची झोप उडवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रात्रीच्या वेळेस घरफोड्या करणे, वाहन व पेट्रोलचोरी करणे अशा घटनांनी पोलिसांची झोप उडवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अखेर विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. सदाशिव पेठेच्या भागांमध्ये काही दिवसांपूर्वी दिवसा आणि रात्रीच्या वेळी घरफोड्या करून चोरी करण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांचे तपाससत्र सुरू होते.
सोलापूर येथील सराईत गुन्हेगार मंजुनाथ कृष्णा श्रीराम (वय ३२ रा. मु. पो. कुरुळी सोनवणेवस्ती, ता. हवेली) याला अटक करून त्याच्याकडून १ लाख २७ हजार रूपये किमतीच्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
तसेच वाहनचोर अजय कोंडीबा शेळके (वय २५, रा. मु.पो. सोनेसांगवी, ता. शिरूर) आणि अभिजित नेपेन मंडल (वय २७, रा. शुक्रवार पेठ) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक बुलेटसह १ लाख ६0 हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत, तर सागर पोपट दरेकर (वय २७, रा. १00५ राजेंद्रनगर) याला लोखंडी कोयत्यासह पकडून त्याच्यावर आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग रवींद्र सेनगावकर, परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक साकोरे, पोलीस हवालदार शरद वाकसे, पोलीस नाईक बाबा दांगडे, संजय बनसोडे, सुकदेव रामाणे, चेतन शिरोडकर, सचिन सुपेकर, धीरज पवार, सचिन जगदाळे यांनी ही कामगिरी केली आहे. पुढील तपास विश्रामबाग तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील करीत आहेत.
विश्रामबाग पोलिसांनी एकूण विश्रामबाग पोलीस ठाण्याकडचे
८ गुन्हे, सिंहगड पोलीस स्टेशनकडील १ आणि खेड पोलीस स्टेशनचे १ असे एकूण १0 गुन्हे उघडकीस आणले.