माजी आमदारांसह ९ घरात चोऱ्या; ८ नावांनी लुटले तब्बल ६० लाख; तामिळनाडुतून महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 08:51 PM2021-09-06T20:51:48+5:302021-09-06T21:19:15+5:30

जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील दागदागिने, रोख रक्कम असा ९ घरातील ६० लाखांहून अधिक ऐवज लुटून नेणाऱ्या महिलेला तामिळनाडुहून जेरबंद केले.

Burglary in 9 houses including former MLA; Rs 60 lakh theft by use 8 fake names up to Rs 60 lakh; Woman arrested from Tamil Nadu | माजी आमदारांसह ९ घरात चोऱ्या; ८ नावांनी लुटले तब्बल ६० लाख; तामिळनाडुतून महिलेला अटक

माजी आमदारांसह ९ घरात चोऱ्या; ८ नावांनी लुटले तब्बल ६० लाख; तामिळनाडुतून महिलेला अटक

Next

पुणे : कामाची गरज असल्याचे सांगून घरकाम करण्यास सुरुवात करुन जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील दागदागिने, रोख रक्कम असा ९ घरातील ६० लाखांहून अधिक ऐवज लुटून नेणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी तामिळनाडुहून जेरबंद केले.

शांती चंद्रन (वय ४३, रा. तिरुवअण्णा मलाई, तामिळनाडु) असे या महिलेचे नाव आहे. चंद्रन वेगवेगळी नावे धारण करुन डिसेंबर २०१८ पासून लोकांची मोलकरीण बनून चोऱ्या करत असल्याचे उघडकीस आले असून आतापर्यंत ९ घरांमध्ये तिने अशा प्रकारे चोरी करुन ६० लाख १० हजार १०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील सोपानबाग येथील मिटटाऊन सोसायटीत एक ६० वर्षांची महिला आपल्या मुलासह राहते. त्यांच्याकडे शांती चंद्रन ही महिला घरकाम करीत होती.घरकाम करण्यासाठी तिने आपले बनावट मराठी नाव सांगितले होते. तिने ८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या जेवणातून फिर्यादी व त्यांच्या मुलाला गुंगीचे औषध दिले होते. त्यांना गुंगी आल्यावर कपाटात ठेवलेले ९ हजार ५०० रुपये चोरुन नेले होते. त्यानंतर ती तामिळनाडुला आपल्या गावी पळून गेली होती.

याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक असलेले कुटुंब हेरुन ही महिला आपण गरजू असल्याचे सांगत असे. त्यांच्याकडे कामाला सुरुवात करीत. तिच्याकडे आधार कार्ड, फोटो मागितला की उद्या आणून देते असे सांगून दोन तीन दिवस काम करीत असे. त्यात ती घरातील दागिने, कपाट पाहून ठेवत. त्यानंतर एके दिवशी त्यांच्या जेवणात किंवा पाण्यात झोपेच्या गोळ्या टाकत. ज्येष्ठ नागरिकांना गुंगी आली की घरातील सर्व ऐवज घेऊन पळून जात असे. कोठेही तिने आपली ओळख होईल, अशा बाबी ठेवल्या नव्हत्या. वानवडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून ही महिला तामिळनाडुमध्ये गावी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तामिळनाडुतून तिला पकडून आणले. सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव अधिक तपास करत आहेत.
....
पुण्यातील माजी महिला आमदार यांच्या घरीही गेल्या वर्षी नोव्हेबरमध्ये या महिलेने अव्वा असे नाव सांगून त्यांच्याकडे घरकाम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या घरातून १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
.....
स्वत:चा औषधांचा गुन्ह्यांसाठी केला गैरवापर
शांती चंद्रन हिला अनेक विकार आहेत. त्यासाठी तिला डॉक्टरांनी झोपेच्या गोळया दिल्या होत्या. या गोळया लोकांच्या जेवणात, पिण्याच्या पाण्यात टाकून त्यांना गुंगी आल्यावर घरातील ऐवज चोरुन नेत होती.

Web Title: Burglary in 9 houses including former MLA; Rs 60 lakh theft by use 8 fake names up to Rs 60 lakh; Woman arrested from Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.