मलठण येथे एक कापड दुकान फोडून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:52+5:302021-04-28T04:10:52+5:30
यामध्ये एक लाख पन्नास हजाराचे कपडे व वस्तू लंपास करण्यास चोरटे यशस्वी झाले आहे. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने चोरीचे ...
यामध्ये एक लाख पन्नास हजाराचे कपडे व वस्तू लंपास करण्यास चोरटे यशस्वी झाले आहे. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे.
या बाबत गेनभाऊ शिंदे यांनी शिरूर पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मलठण ( ता. शिरूर ) येथील शिंदे कॉम्प्लेक्समधील कांतीलाल बारगळ यांच्या रुद्र ब्रँड हाऊस मधून कपडे, बूट ह्या वस्तूंची रविवारी (ता. 25 ) रात्री दुकानाचे शटर तोडून चोरी केली. यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. शिंदे वस्तीवरील विनायक रामचंद्र शिंदे यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी 132 इंची एलएडी टिव्ही, शेगडी व काही वस्तूंची चोरी केली आहे. कांतीलाल बारगळ ह्या सुशिक्षित बेरोजगाराने चार महिन्यापूर्वी दुकान सुरू केले होते. त्यासाठी त्याने कर्जप्रकरण केले होते. नव्या उमेदीने सुरू केलेल्या हे दुकान लॉकडाऊनमुळे बंद होते. त्यातच चोरी झाल्यामुळे व दुकानातील बरेच कपडे चोरीस गेल्याने त्यांची अवस्था झाली आहे. विनायक शिंदे हे पोलीस दलात पुणे येथे कर्तव्यावर होते .
गावात नरेंद्र राजगुरू यांचे टायर पंक्चरचे दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यांना वेळीच जाग आल्याने चोर मोटार सायकलवरून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हा दाखल होण्यास खुप वेळ लागला असुन पोलिस तात्काळ घटनास्थळी भेट देत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली . तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गवारे करीत आहेत.