धनकवडीत बंद सदनिका फोडून चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:18+5:302021-03-10T04:13:18+5:30
धनकवडीतील मध्यवर्ती ठिकाणी भरवस्तीत असलेल्या या सोसायटीत गेल्या चार पाच वर्षात बंद सदनिका फोडून चोऱ्या होण्याची ही तीसरी घटना ...
धनकवडीतील मध्यवर्ती ठिकाणी भरवस्तीत असलेल्या या सोसायटीत गेल्या चार पाच वर्षात बंद सदनिका फोडून चोऱ्या होण्याची ही तीसरी घटना असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
धनकवडी पोलीस चौकीच्या केवळ शंभर फूट अंतरावर हि सोसायटी आहे. या सोसायटीतील तीन इमारतीतील चार बंद सदनिकीचे कडी कोयंडे तोडून या चोर्या झाल्या. बी ३ या इमारतीत राहणारे अभिजीत मुडवीकर हे उपचारासाठी निपाणीला गेले होते. त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आतील कपाट फोडण्याच्या आवाजाने आजूबाजूच्या रहिवाशी जागे झाले आणि आरडाओरडा केला. सुरक्षा रक्षक आवाजाच्या दिशेने धावला तोच चोरटे पसार झाले होते.
दरम्यान इमारतीतील सर्व बंद फ्लॅट रहिवाशांनी जावून पाहिले असता चार बंद फ्लॅटचे दरवाजा तोडण्यात आले होते. सी इमारतीतील रमेश कुंटे, बी ४ ईमारतीतील योगेश बत्ती तर बी ३ या ईमारतीतील दिपक गोहाड आणि अभिजीत मुडवीकर यांच्या बंद सदनिकांमध्ये मध्ये चोरी झाल्याचे निप्षन्न होताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी आलेल्या सहकारनगर पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरूवात केली. चोरटे मुख्य प्रवेशव्दारातून येण्याऐवजी सोसायटीच्या गणेश मंदीरामागील एका लहान प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून आल्याचे रहिवाशांनी पोलिसांना निदर्शनास आणून दिले. दरम्यान सर्वच सदनिका बंद असल्याने किती ऐवज चोरीला गेला हे मात्र कळू शकले नाही.