घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला साथीदारांसह अटक; मोक्कांतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:29+5:302021-03-14T04:10:29+5:30

पुणे : 'साहब किधर जा रहे हो?' अशी वॉचमनने विचारणा केली असता, चार गुंडांनी बेदम मारहाण केल्याचा ...

Burglary innkeeper arrested with accomplices; Moccasin action | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला साथीदारांसह अटक; मोक्कांतर्गत कारवाई

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला साथीदारांसह अटक; मोक्कांतर्गत कारवाई

Next

पुणे : 'साहब किधर जा रहे हो?' अशी वॉचमनने विचारणा केली असता, चार गुंडांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार औंध येथे घडला आहे. वॉचमनला चाकूचा धाक दाखवत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर चतु:श्रृंगी पोलिसांकडून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बिरजूसिंग रजपूतसिंग दुधाणी (वय ३७, रा,रामटेकडी शाळेमागे, हडपसर), बिंतुसिंग शामसिंग कल्याणी (वय २४, रा.रामटेकडी हडपसर), सनीसिंग पापासिंग दुधाणी (वय २१ बिराजदार नगर, हडपसर) यांच्यासह एकाला अटक केली आहे. याप्रकरणी ४४ वर्षीय वॉचमन (रा. शैलेश टॉवर, सिद्धार्थनगर फेज ३ औंध) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोसायटीच्या गेटजवळ थांबले होते. त्यापासून १०० मीटर अंतरावर एक चारचाकी गाडी थांबली. त्यामधून चार जण बाहेर आले. सोसायटीच्या गेटजवळ आल्यावर वॉचमनला न विचारता आत जात होते. त्या क्षणी फिर्यादीने साहब, किधर जाना है, अशी त्यांना विचारणा केली. तेव्हा त्या चार जणांनी फिर्यादीला मारण्यास सुरुवात केली. चाकूचा धाक दाखवून ‘गप्प बस, नाहीतर तुला खल्लास करेन, अशी धमकी दिली. चौघांपैकी एक जण फिर्यादीजवळ चाकू घेऊन थांबला होता. बाकी तिघे सोसायटीत गेले. अर्ध्या तासाने तिघे एक एलईडी टीव्ही घेऊन बाहेर आले. टीव्ही घेऊन जात असताना पोलिसांची दुचाकी येताना पाहून ते स्वत:च्या चारचाकीत बसून निघून गेले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळीप्रमुख बिरजूसिंग दुधानी याने टोळी निर्माण करून घरफोडीसारखे गुन्हे केले आहेत. तसेच बेकायदेशीर मार्गाने टोळीचे वर्चस्व, दहशत कायम ठेवून वाहन चोरी, दरोडा, जबरी चोरी, शासकीय नोकरावर प्राणघातक हल्ला असे गंभीर गुन्हे सातत्याने केले आहेत. कारवाई करण्याबाबत प्रस्ताव चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण यांना सादर केला होता. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव हे करत आहेत.

---------------

Web Title: Burglary innkeeper arrested with accomplices; Moccasin action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.