निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच घरफोडी; पोलिसांना उशिरा कळाले

By नारायण बडगुजर | Published: June 6, 2024 04:17 PM2024-06-06T16:17:21+5:302024-06-06T16:18:07+5:30

चोरट्याने घरातील कपाटामधील ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि एक टॅब चोरून नेला

Burglary just behind Nigdi Police Station The police found out too late | निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच घरफोडी; पोलिसांना उशिरा कळाले

निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच घरफोडी; पोलिसांना उशिरा कळाले

पिंपरी : गॅलरीच्या ग्रीलचा दरवाजा उघडून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातून मोबाईल फोन आणि टॅब चोरून नेला. निगडीपोलिस ठाण्याच्या पाठीमागील बाजूला २८ मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सौरभ श्रीनिवास जोशी (३६, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ५) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोशी हे २८ मे रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास झोपेतून उठले. त्यानंतर ते बाथरुममध्ये गेले. त्यावेळी त्यांना कपाट उघडल्याचा आवाज आला. त्यांनी हॉलमध्ये जाऊन पाहणी केली असता हॉलच्या गॅलरीच्या ग्रीलचा लोखंडी दरवाजा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटामधील ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि एक टॅब चोरून नेला.

Web Title: Burglary just behind Nigdi Police Station The police found out too late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.