सराईत गुन्हेगारांकडून घरफोडी, वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस; १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:13 PM2017-10-03T15:13:22+5:302017-10-03T15:19:41+5:30

संशयितपणे फिरत असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घरफोडी आणि वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

burglary, vehicle trafficking are exposed; 1 lakh 4 thousand 500 rupees money seized | सराईत गुन्हेगारांकडून घरफोडी, वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस; १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

सराईत गुन्हेगारांकडून घरफोडी, वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस; १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देदोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारएक दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुददेमाल जप्त

पुणे : संशयितपणे फिरत असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घरफोडी आणि वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून एक दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. दरोडा प्रतिबंधक पथक, दक्षिण प्रादेशिक विभाग पुणे शहर पथकाने ही कारवाई केली. 
दिगंबर गजेंद्र मांदळे (वय २४, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सहयोगनगर वारजे) आणि नितीन लक्ष्मण तांबारे (वय २७, रा. लक्ष्मीनगर झोपडपट्टी, डहाणूकर कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही संशयितरित्या फिरताना आढळल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली असता मांदळे याने दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि तांबारे याने फरासखाना पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये दुचाकी वाहन आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हददीत घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. 
सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, पोलीस हवालदार बापू खुटवड, दिनेश शिंदे, कृष्णा बढे, रवींद्र फुलपगारे, प्रमोद मोहिते, योगेश घाटगे, अय्याज दड्डीकर, पोलीस शिपाई सचिन ढोक, मयूर शिंदे, महावीर वलटे, अवधूत जमदाडे, नितीन जगदाळे, अविनाश कोंडे, निलेश जाधव, वैभव शितकल, विजय जगताप, संजय बनसोडे, नितेश जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: burglary, vehicle trafficking are exposed; 1 lakh 4 thousand 500 rupees money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.