जुन्नर लौक्यातील बोरी बुद्रूक शिवारात छापा; ५ लाख ३५ हजारांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2024 04:10 PM2024-04-07T16:10:27+5:302024-04-07T16:10:50+5:30
संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे
राजुरी : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रूक शिवारातील ठाकरवाडीत टाकलेल्या छाप्यात विक्रेत्याला अटक करून ५ लाख ३६ हजार किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. जुन्नर न्यायालयाने आरोपी सुरेश मनोहर केदारी यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले.
आळेफाटा पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांना एक एप्रिलला खबऱ्याकडून बोरी बुद्रुक शिवारातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील ठाकरवाडीत सुरेश मनोहर केदारी यांच्या घरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने टाकलेल्या छाप्यात १७ किलो ८६५ ग्रॅम वजनाचा अंदाजे ५ लाख ३५ हजार ९५० रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. आळेफाटा पोलिसांनी संशयित आरोपी सुरेश मनोहर केदारी (वय ३५, रा. बोरी बुद्रुक, ठाकरवाडी, ता. जुन्नर) यांना अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .