पाटसमध्ये अडीच एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:21 AM2020-12-03T04:21:35+5:302020-12-03T04:21:35+5:30
वरवंड कौठीचा मळा येथे राहणारे प्रदीप आत्माराम दिवेकर, तुकाराम सखाराम खळदे यांचे जमीन पाटस हद्दीत दिवेकर यांची दीड एकर ...
वरवंड कौठीचा मळा येथे राहणारे प्रदीप आत्माराम दिवेकर, तुकाराम सखाराम खळदे यांचे जमीन पाटस हद्दीत दिवेकर यांची दीड एकर व खळदे यांचे एक एकर क्षेत्र या आगीमध्ये जळून खाक झाले आहे.वरवंड व पाटस हद्दीतीमध्ये मोठ्या प्रमाणात अशाप्रकारच्या तारा लोंबकळत आहे. यामुळे मोठे नुकसान होत आहे. या जळालेल्या उसाचे नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
सवीसपाटा येथे या दोघांचे क्षेत्र आहे दुपारच्या वेळी अचानक तारांच्या घर्षणाने उसात ठिणगी पडली व काही समजण्याचा आत उभ्या पिकाने पेट घेतला ही बातमी सोशल मीडियावरून गावच्या ग्रुपवर व पोलीस पाटील किशोर दिवेकर यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा फोन करून गावातील नागरिकांना मदतीसाठी पाठवले यामुळे गावातील प्रदीप किसन दिवेकर व अन्य कार्यकर्ते मदतीसाठी धावले व शेजारी मोठ्या प्रमाणात असणारा उसाचे क्षेत्र वाचले आहे.
महावितरणचा भोंगळ कारभारामुळे हे नुकसान झाले आहे तरी झालेले नुकसान भरपाई मिळावी व परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे यामुळे लोंबकळणारी तारा दुरुस्ती करावी, अशी मागणी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दिवेकर यांनी केले.
फोटो ओळ : उसाला लागलेली आग विझवताना कार्यकर्ते
0२१२२0२0-दौंड-१0