वीस एकर ऊस जळाला

By admin | Published: November 26, 2014 11:37 PM2014-11-26T23:37:43+5:302014-11-26T23:37:43+5:30

मरकळ (ता.खेड) येथे विद्युत जानित्रतील बिघाड व तारांच्या घर्षणामुळे सुमारे 2क् एकर ऊस जळून खाक झाला.

Burn twenty acres of sugarcane | वीस एकर ऊस जळाला

वीस एकर ऊस जळाला

Next
शेलपिंपळगाव :  मरकळ (ता.खेड) येथे विद्युत जानित्रतील बिघाड व  तारांच्या घर्षणामुळे सुमारे 2क् एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थांच्या व तरुण कार्यकत्र्यांच्या सतर्कतेमुळे पुढील शेकडो एकर ऊस आगीपासून वाचविण्यात नागरिकांना यश मिळाले. जळीत पिकाची साखर कारखान्यांनी लवकरात - लवकर तोडणी करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांकडून केली जात आहे.
मरकळ गावच्या पश्चिमेकडील बाजूस आळंदी रस्त्याच्या लगत शेकडो एकर क्षेत्र उस पिकाखाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या उसाच्या क्षेत्रत विद्युत तारांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून, तारा हाताच्या अंतरावर पोहचल्या आहेत. याबाबत सबंधित ऊस उत्पादक शेतक:यांनी अनेकदा विद्युत महामंडळ वितरण कंपनीकडे तक्रार केली होती. परंतु विद्युत महामंडळ कंपनीने कायमच शेतक:यांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. आज दुपारी दोनच्या सुमारास याठिकाणी असलेल्या विद्युत जनित्र पासून काही तरी बिघाड घडून आल्याने व लोंमकळत्या तारा एकमेकांना लागल्याने आगीच्या ज्वाळा तयार होऊन त्या जमिनीवर पडल्या. तारांच्या खाली उस पिक असल्याने अगदी कमी वेळात पिकाने पेट घेतला. आग मोठी असल्याने फार कमी वेळात जास्त उसाचे क्षेत्र पेटत गेले.
आगीमध्ये सुभाष लोखंडे, सावकार लोखंडे, बाबासाहेब थोरात, साळूबाई खांदवे, भुजबळ, शिवाजी गोडसे, मारुती घेनंद आदी उस उत्पादक शेतक:यांचा उस जाळून भस्मसात झाला आहे. दरम्यान गावातील ग्रामस्थ व तरुण कार्यकत्र्यांनी जमा होऊन हि आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली गेली. दरम्यान या पेटलेल्या उस पिकाची तलाठी भाऊसाहेब पाटील व अधिका:यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. ऊस पिकाची ज्या कारखान्याकडे नोंद केलेली आहे, तो कारखाना हा पेटलेल्या उसाची तोडणी करणार असल्याचे अधिका:यांकडून समजते. विद्युत महामंडळ कंपनीचा कामगार गावात कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
 
4मरकळ (ता.खेड) परिसरात पाण्याची हमी असल्याने हजारो हेक्टर क्षेत्र उस पिकाच्या लागवडीखाली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील विद्युत यंत्रणा धोकादायक अवस्थेत आहे. विद्युत  तारा हाताच्या अंतरावर येऊन पोहचल्या आहेत. तर काही ठिकाणी नागरी वस्तीत घरांवर या  तारा येऊन पोहचल्या आहेत. याबाबत  विद्युत महामंडळ कंपनीकडे शेतक:यांनी वारंवार तक्रार करूनही सबंधित कंपनी शेतक:यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
 
4विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे उस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान घडून आले आहे. लोकवस्तीत काही  ठिकाणी तारा हाताच्या अंतरावर आलेल्या आहेत. आज उस या तारांना बळी पडला त्यामुळे विद्यत महामंडळ कंपनीने तात्काळ शेतक:यांच्या अडचणी लक्षात घेऊन झालेल्या तारांची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी माजी सरपंच अनिल लोखंडे, कैलास लोखंडे, रमेश गोडसे, सुभाष लोखंडे, सावकार लोखंडे, बाबासाहेब थोरात, साळूबाई खांदवे, शिवाजी गोडसे, मारुती घेनंद आदींसह नागरिक करत आहेत.
 
आगीला बळी पडलेल्या उसाची उद्यापासून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून तोडणी सुरु केली जाईल. ज्या शेतक:यांनी आपला उस इतर कारखान्यांना नोंदविला आहे, त्यांनी त्या कारखान्यांना संपर्क साधून ऊस तोडून घ्यावा. शेतक:यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाईल
- अनिल लोखंडे ,
 मा. उपाध्यक्ष. संत. तुकाराम सहकारी साखर कारखाना

 

Web Title: Burn twenty acres of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.