आत्महत्येनंतर यवतमध्ये जाळपोळ
By admin | Published: November 1, 2014 11:01 PM2014-11-01T23:01:01+5:302014-11-01T23:01:01+5:30
यवत येथील पॉली हाऊसमध्ये काम करणा:या कर्मचा:याने तेथील व्यवस्थापक व सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
Next
यवत : यवत येथील पॉली हाऊसमध्ये काम करणा:या कर्मचा:याने तेथील व्यवस्थापक व सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज (दि.1) रोजी दुपारच्या सुमारास सुनिल दगडू ढमाळ (वय 4क्) याने यवत - भुलेश्वर रोड नजीक रावबाच्या वाडी जवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीत त्याने आत्महत्येचे कारण लिहून ठेवले होते . सदर चिठ्ठी यवत पोलिसांच्या ताब्यात आहे.
मयत सुनिल ढमाळ याचा मावस भाऊ अशोक वामन दोरगे याने यवत पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी मल्होत्र अँग्रो पॉली हाऊसचा व्यवस्थापक कार्तिक शामसुंदर मेहता ( वय 58, रा.अहमदाबाद , गुजरात ) , व प्रशांत नाना खोसे ( वय 34, रा.यवत , ता.दौंड) यांना ताब्यात घेतले आहे. सदर आत्महत्येचे कारण समजताच संतप्त जमावाने मल्होत्र अँग्रो पॉलीहाऊस व तेथील गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)
4पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मल्होत्र अँग्रो येथे पॉली हाऊसच्या मदतीने शेतीमाल उत्पादन करण्याचे काम चालते . मयत सुनिल ढमाळ हा तेथे कामाला होता. तेथील व्यवस्थापक कार्तिक मल्होत्र याचे तेथेच काम करणा:या एका महिलेशी अनैतिक संबंध होते . ते सुनिल याने पाहिले होते. याचा राग मनात धरून मेहता तेथेच काम करणा:या प्रशांत खोसे याच्या मदतीने वारंवार त्रस देत होता. आज सुनिल याला किरकोळ कारणावरुण कामावरून काढून टाकण्यात आले. या सततच्या त्रसाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. तसेच व्यवस्थापक कार्तिक मेहता व प्रशांत खोसे यांनीच मावस भाऊ सुनिल ढमाळ याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून , मयताच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठी मधील अक्षर सुनिल याचेच असून त्याने सदर चिठ्ठीत आत्महत्येचे कारण स्पष्ट लिहिले असल्याचे फियार्दी अशोक दोरगे यांनी फिर्यादित नमूद केले आहे.