अनधिकृत ‘टेरेस हॉटेलां’चे फुटले पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:58+5:302020-12-15T04:28:58+5:30
सर्रास विनापरवाना चालू : पोलिस, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात विशेषत: उपनगरांमध्ये व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवर ...
सर्रास विनापरवाना चालू : पोलिस, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात विशेषत: उपनगरांमध्ये व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवर अनाधिकृतरित्या शेड टाकून व ‘गार्डन लुक’ देऊन ‘रूफ टॉप’चा सर्रास वापर हॉटेल व्यावसायासाठी केला जात आहे़ याकरता आवश्यक बांधकामासाठी महापालिकेची परवानगी घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पार्किंगची सोय नाही, स्वच्छतागृहे नाहीत अशा अवस्थेत अपुऱ्या जागेत जास्तीत जास्त ‘टेबल’ कोंबून धंदा केला जात आहेत. काही ठिकाणी मद्यविक्री केली जात आहे. या बद्दल स्थानिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
व्यावसायिक इमारतीचा बांधकाम परवाना देताना इमारतीच्या ‘टेरेस’चा वापर सर्वांनाच करता येतो़ पण या टेरेसवर अनाधिकृतरित्या निवारा करुन हजारो स्क्वेअर फूट जागेत हॉटेल, रेस्टॉरंट व बारचा व्यवसाय फोफावला आहे. दोन-तीन मजल्यांच्या इमारतींपासून इतर उंच इमारतींच्या टेरेसचा वापर यासाठी होतो आहे़
हॉटेल व्यावसायिकांना इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरील जागा भाडेतत्वावर देऊन, त्यांना व्यवसायाची मोकळीक काही इमारत मालकांकडून दिली जात आहे़ अशावेळी इमारतीच्यच्या गच्चीत लहान-मोठी बांधकामे, विद्यूत रोषणाई सुरु झाली आहे. काही ठिकाणी ‘गार्डन लुक’ देऊन खुल्या गच्चीत मोठ्या आवाजात कर्ण्यावरुन गाणी लावली जातात. काही ठिकाणी मद्यविक्रीही केली जात आहे़
-------------