रामटेकडी पुलावरील बीआरटी मार्गात बसचा भीषण अपघात; पीएमपीएमएल चालक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 10:09 AM2022-12-03T10:09:07+5:302022-12-03T10:10:27+5:30

वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. 

bus accident on BRT route on Ramtekdi Bridge; PMPML driver seriously injured | रामटेकडी पुलावरील बीआरटी मार्गात बसचा भीषण अपघात; पीएमपीएमएल चालक गंभीर जखमी

रामटेकडी पुलावरील बीआरटी मार्गात बसचा भीषण अपघात; पीएमपीएमएल चालक गंभीर जखमी

googlenewsNext

वानवडी : रामटेकडी-वैद्यूवाडी पुलावरील बीआरटी मार्गात पहाटे ४.३० च्या सुमारास खासगी ट्रॅव्हल व पीएमपीएमएल बसला अपघात होऊन पीएमपीएमएल चालक गंभीर जखमी झाला आहे. सुनिल कोलते असे पीएमपीएमएल बस चालकाचे नाव असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

पहाटेच्या वेळी पीएमपीएमएलची रातराणी सीएनजी बस  (एमएच १२ आरएन ९०५३) व खासगी कंपनीची ट्रव्हल बस (एनएल ०१बी २३०६) या वाहनांची रामटेकडी पुलावरील बीआरटी मार्गात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. 

गंभीर दुखापत झालेल्या चालकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातासंदर्भात अद्याप वानवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नसून वाहतुक पोलीस घटनास्थळी येऊन वाहतुक नियंत्रणाचे कार्य करत आहेत.
 

Web Title: bus accident on BRT route on Ramtekdi Bridge; PMPML driver seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.