आंबेगाव तालुक्यात कळंबला बस, मोटारीची समोरासमोर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 07:01 PM2019-05-20T19:01:40+5:302019-05-20T19:02:47+5:30
कळंब येथे एसटी बस आणि चारचाकी वाहनांची धडक झाली.
मंचर : कळंब (ता. आंबेगाव) येथील तिरंगा ढाब्यासमोर सोमवारी (दि २०) सकाळी सव्वासहाच्या सुमारास एस टी बस आणि चारचाकी वाहनांची धडक झाली. बस चालकाने दाखलवेल्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. गाडीतील ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर मोटारीतील एअर बॅग उघडल्याने गाडीतील ३ प्रवाशी बचावले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पुणे बस (एमएच- ४०. एन. ९५३०) आणि मोटार (एमएच- १२ जेएक्स. ००७६) यांचा अपघात झाला. एसटी बस चालक जगन्नाथ भोर यांनी प्रसंगावधान राखत बस पलीकडच्या ओढ्यात बस दाबल्याने बसमधील चार प्रवासी काहीही ईजा न होता बचावले. तसेच गाडीतील तीन प्रवासी सुदैवाने गाडीची एअरबॅग वेळत उगलड्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुर्घटनेनंतर या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. बाळासाहेब भालेराव, संजय उर्फ नागेश भालेराव, मारुती गोपाळे, विजय भालेराव, राजेंद्र भालेराव, गोकुळ भालेराव, वाहक ज्ञानेश्वर कांगले, बसचालक जगन्नाथ भोर यांच्यासह आदींनी पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करण्याकामी मदत केली. घटनास्थळी नारायणगाव बस स्थानकाचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक महेश विटे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
यावेळी त्यांनी सांगितले की बसचे जवळपास ३५ ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. घटनास्थळी नऊच्या दरम्यान मंचर पोलीस स्थानकाचे कर्मचारी वर्गाने येवून पंचनामा केला. व वाहतूक सुरळीत करणे कामी मदत केली. या अपघातामुळे सहाणे मळा वस्तीपर्यंत आणि मंचर खिंडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून रस्ता पूर्णपणे जाम झाला होता. ट्राफिक जाम झाल्यामुळे वाहन काढताना गाडी पुढे घेताना बाचाबाची वाहनचालक करत होते. अपघातानंतर कामावर जाणारे चाकरमाने, प्रवासी, तरूण, नागरिक जवळपास दोन ते तीन तास वाहन कोंडीत अडकून पडले. कळंब बाह्यवळणाचे काम प्रलंबित असल्याने अपघातानंतर नेहमीच दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागून पुणे नाशिक महामार्ग जाम होवून प्रवासी बांधवांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघात संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.