बीअारटी मार्गात बसला अाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:07 PM2018-03-29T13:07:32+5:302018-03-29T13:07:32+5:30
विमाननगर येथील बीअारटी मार्गात चालत्या बसने अाज सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. बसला लागलेल्या अागीत बसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले.
पुणे : विमाननगर येथील बीआरटी बस स्टॉपजवळ शॉर्टसर्किटमुळे बसला लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली. अाज सकाळी साडेदहाच्या सुमारास इनॉर्बिट मॉल समोरच्या बीआरटी मार्गात ही घटना घडली .
बसने अचानक पेट घेतल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.घटनास्थळी विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय नाईक पाटील व कर्मचार्यांनी धाव घेतली . अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ येऊन बसला लागलेली आग पूर्णपणे विझवली .या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत इतर कोणतेही नुकसान झालेले नाही. अाग लागली तेव्हा बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत हाेते. बसचालक जनार्दन बडे यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे ही बस नवीनच हाेती. निगडी ते वाघाेली या मार्गावरील ही बस हाेती.
आज शहरात उपराष्ट्रपती येत असून त्याचा बंदोबस्त सुरू असल्यामुळे सर्वच मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे .अचानक बसने पेट घेतल्याच्या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ झाली .सकाळी नगर रस्त्याच्या रहदारीच्या मार्गावर ही घटना घडल्या वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती .