बस खरेदीवरून सभेत जोरदार खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 02:15 AM2019-01-24T02:15:16+5:302019-01-24T02:15:22+5:30
पुुणेकरांना चांगली सुविधा मिळत नसताना किती वर्षे पीएमपीचा तोडा पुणेकरांनी सहन करायचा, असा प्रश्नांचा भडीमार करत विरोधकांनी बस खरेदी वरुन सत्ताधाºयांना चांगलेच धारेवर धरले.
पुणे : एसी बसमुळे शहराच्या प्रदूषणात भर पडणार नाही का, संचालनातील तूट कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बसचा फायदा होणार आहे, मग अधिक खर्चिक असलेल्या तब्बल ४०० सीएनजी बस का खरेदी करायच्या, बस खरेदीत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची ‘राफेल’ नाही ना, पुुणेकरांना चांगली सुविधा मिळत नसताना किती वर्षे पीएमपीचा तोडा पुणेकरांनी सहन करायचा, असा प्रश्नांचा भडीमार करत विरोधकांनी बस खरेदी वरुन सत्ताधाºयांना चांगलेच धारेवर धरले. महापालिकेच्या सभेत पीएमपी बस खरेदीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर पुणे महापालिकेच्या हिश्शाच्या २४० बसेस करीता आवश्यक ११६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी पुणे महानगर परिवहन महामंडळाला टप्प्याटप्प्याने वर्ग करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
विरोधकांसह सत्ताधारी भाजपाच्या काही सदस्यांनीदेखील पीएमपीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक व पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्टीकरण देत भाजपाने पुणेकरांचे हित लक्षात घेऊन कमीत कमी किमतीत बस कशा खरेदी केल्याचे सांगितले. तसेच आॅगस्ट २०१९ पर्यंत शहरात ९९० नवीन बस दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले.
>ंपीएमपी करते नव्याने ४०० सीएनजी बस खरेदी करण्यात येणार असून, यामध्ये पुणे महापालिकेच्या हिश्श्याच्या २४० बससाठी आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने पीएमपीला देण्यासाठी आयुक्तांना अधिकार देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. या विषयावर चर्चा करताना विरोधकांनी पीएमपी प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाला चांगलेच धारेवर धरले.