बसस्थानक अवैध व्यवसायाचा अड्डा
By admin | Published: July 24, 2015 04:40 AM2015-07-24T04:40:39+5:302015-07-24T04:40:39+5:30
येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसराचा
आळंदी : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसराचा वापर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व वाळूचे ट्रक थांबण्यासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.
आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्यामुळे राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून गेल्या २० वर्षांपूर्वी वाजत-गाजत या स्थानक परिसराचे भूमिपूजन केले. त्यासाठी नगर परिषदेनेही कोणतीही हरकत न घेता महामंडळासाठी जागा आरक्षित करून दिली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच पीएमटीची बस सेवा सुरू झाली.
आळंदीकरांची व येथे येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली, याचा अंदाज घेऊन स्वारगेटमध्ये बसून जिल्ह्याच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या कारभाऱ्यांनी आळंदीकडे कायमचेच दुर्लक्षच केल्याचे चित्र दिसून येते.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी, यात्रेकरू यांचा आळंदी येथे नेहमीचा प्रवास आहे. वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले, अपंग
अशा सर्वांसाठी राज्य परिवहन महामंडळाची सेवा सोयीची वाटते. परंतु, ही सेवा त्यांच्यासाठी अर्धवट आहे. याबसने प्रवास करणारे
प्रवासी शिवाजीनगर किंवा स्वारगेट येथे नाइलाजास्तव उतरतात.
तिथून सुरू होणारा त्यांचा प्रवास भयानक विदारक! तिथून आळंदीत येण्यासाठी पीएमपीएल हा एकमेव पर्याय समोर असल्यामुळे डोक्यावर, पाठीवर मोठे गाठोडे घेऊन धावत पळत पीएमपीची बस पकडावी लागते. (वार्ताहर)