जीएसटीमुळे व्यवसाय सोयीस्कर

By admin | Published: June 10, 2017 02:17 AM2017-06-10T02:17:38+5:302017-06-10T02:17:38+5:30

जीएसटी लागू झाल्यावर व्यवसाय करणे आणखी सोयीस्कर होईल. हा कायदा देशाच्या प्रगतीमधील मोठे पाऊल ठरेल, असे मत खासदार

Business facilitating GST | जीएसटीमुळे व्यवसाय सोयीस्कर

जीएसटीमुळे व्यवसाय सोयीस्कर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बिबवेवाडी : जीएसटी लागू झाल्यावर व्यवसाय करणे आणखी सोयीस्कर होईल. हा कायदा देशाच्या प्रगतीमधील मोठे पाऊल ठरेल, असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. बिबवेवाडी येथे इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट्स आॅफ इंडिया यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘जीएसटी सहायता डेस्क’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जीएसटीबाबत छोटे व्यापारी व इतरांसाठी या कायद्याविषयी माहिती, अडचणी, नागरिकांना या डेक्सच्या माध्यमातून तज्ज्ञामार्फत मोफत दिली जाणार आहे. दर हप्त्याला तीन दिवस ही माहिती दिली जाणार आहे.
या वेळी व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना  उत्तर देताना सीए अरुण आनंदगिरी म्हणाले, ‘‘हे सहायता डेस्क पूर्णपणे कार्यरत आहे आणि ह्याच्या मदतीने जीएसटीबाबतची माहिती अधिक सहज व सुलभपणे प्रत्येक व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल. जीएसटी व्यापारी, उद्योजक, एसएमई क्षेत्र आदींच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात मदत करेल.’’
या वेळी सी. ए. सागर शहा, सी. ए. आनंद जगोटिया, सी. ए. राजेश अग्रवाल, सी. ए. रेखा धामणकर उपस्थित होते.

Web Title: Business facilitating GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.