प्रेमभंग झालेल्या उद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार ; बोट तुटून पडले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 08:10 PM2019-01-16T20:10:25+5:302019-01-16T20:11:57+5:30

प्रेमभंग झाल्याने एका उद्योजकाने प्रियसीची दुचाकी अडवून तिच्यावर भर रस्त्यात चॉपरने वार केले.

businessman attack on his girlfriend | प्रेमभंग झालेल्या उद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार ; बोट तुटून पडले रस्त्यावर

प्रेमभंग झालेल्या उद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार ; बोट तुटून पडले रस्त्यावर

googlenewsNext

पुणे : प्रेमभंग झाल्याने एका उद्योजकाने प्रियसीची दुचाकी अडवून तिच्यावर भर रस्त्यात चॉपरने वार केले. या हल्ल्यात प्रियसीच्या डोक्यावर, मानेवर, पाठीवार आणी दोन्ही हातावर गंभीर जखमा झाल्या असून तिचे हाताचे बोट तुटुन रस्त्यावर पडले.  
मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता नांदेडफाटा येथे ही घडली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत संबंधीत प्रियसी नागरिकांकडे मदतीची याचना करीत होती. स्थानिकांनी तिला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले. मोहिनी रामसिंग ठाकुर (वय २६) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण धावडे (रा. कोल्हेवाडी, ता. हवेली) याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहिनी ठाकुर हिचे ब्युटीपार्लर असून आरोपी धावडे हा उद्योजक आहे. लक्ष्मण हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. आठ वषार्पासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मागील वर्षी त्यांच्यामध्ये काही कारणास्तव भांडण झाले होते. त्यानंतरही लक्ष्मण हा तीच्या मागावर रहात होता. तिला पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी वेळोवेळी त्रास देत होता. मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता फिर्यादी ब्युटीपार्लर बंद करून दुचाकीवर घरी जात होत्या. त्या नांदेडफाटा येथील बारांगणी मळाजवळ पोहचल्या असता लक्ष्मण याने त्याची कार (एमएच १२ - एस ०१९१) आडवी घालून त्यांना थांबवले. त्यानंतर त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. चिडलेल्या लक्ष्मण याने गाडीतील मागील सीटवर असलेले चॉपरसारखे धारदार हत्यार काढुन मोहीनी यांच्या मानेवर, पाठीवर, दोन्ही हातावर सपासप वार केले त्यात तिच्या डावे हाताचे अंगठ्या शेजारील बोट तुटून पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्या मदतीसाठी याचना करीत होत्या. स्थानिकांनी त्यांना रुग्णालायत दाखल केले.  या प्रकरात लक्ष्मण यावर ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सिंहगड पोलिसांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे तपास करीत आहे. 

Web Title: businessman attack on his girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.