व्यावसायिकाने रचला अपहरणाचा बनाव

By Admin | Published: September 23, 2015 03:42 AM2015-09-23T03:42:51+5:302015-09-23T03:42:51+5:30

अनेकांची झालेली देणी आणि कर्जबाजारीपणामुळे सुरक्षारक्षक एजन्सी चालवणाऱ्या व्यावसायिकाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले असून

Businessman created kidnapping | व्यावसायिकाने रचला अपहरणाचा बनाव

व्यावसायिकाने रचला अपहरणाचा बनाव

googlenewsNext

पुणे : अनेकांची झालेली देणी आणि कर्जबाजारीपणामुळे सुरक्षारक्षक एजन्सी चालवणाऱ्या व्यावसायिकाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले असून, यामुळे पोलिसांची मात्र तीन दिवस चांगलीच धावपळ उडाली. पोलीस यंत्रणेला कामाला लावून हा व्यावसायिक दिल्लीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. व्यावसायिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रवीणकुमार निरंजन शर्मा (वय ४0, रा. निलगिरी पठार, आंबेगाव पठार) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. शर्मा यांच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. शर्मा यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या पत्नीला धमकीचे फोन आणि मेसेज येऊ लागल्यामुळे पत्नीही घाबरून गेली होती. पोलिसांनी तसेच खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील व त्यांच्या पथकाने मोबाईलसह अन्य तांत्रिक बाबींचा तपास करून शर्मा यांचे ‘लोकेशन’ घेतले. शर्मा दिल्लीमधील नोएडा येथे असल्याचे निष्पन्न झाल्यावर तपास पथकाचे उपनिरीक्षक अमोल देवकर व कर्मचारी कुंदन शिंदे यांना तातडीने दिल्लीला विमानाने रवाना केले.
पोलीस दिल्लीमधील शर्मा उतरलेल्या हॉटेलमध्ये पोचले खरे; परंतु तेथून शर्मा दिल्ली विमानतळावर गेल्याची माहिती मिळताच पोलीस तिकडे धावले. पण ते विमान निघाले होते. त्यामुळे पुणे विमानतळावर पोलिसांनी शर्मा यांना ताब्यात घेतले.

Web Title: Businessman created kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.