पुण्यात पत्नी व दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 11:22 AM2018-02-17T11:22:08+5:302018-02-17T13:30:41+5:30
पुण्यातील शिवणे भागात एका व्यावसायिकाने कुटुंबाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे.
पुणे- पुण्यातील शिवणे भागात एका व्यावसायिकाने कुटुंबाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे. पुण्यातील व्यावसायिक निलेश चौधरीने पत्नी व दोन मुलींची हत्या केली व नंतर स्वतः आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. निलेश चौधरी या व्यावसायिकाने कर्जबारीपणाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. निलेश सुरेश चौधरी ( वय 38), नीलम निलेश चौधरी(,वय 33 ), श्रेया निलेश चौधरी (वय 7 ), श्रावणी निलेश चौधरी (वय 9 ) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, निलेशच्या डोक्यावर खूप कर्ज झाले होतं. ते फेडणं शक्य नसल्याने त्यांनी हे पाऊल उचचलं असावं. निलेश यांनी तिघांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून, कर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटलं आहे.
चौधरी याचं घर काल दुपारपासून बंद होते. रात्री उशिरापर्यंत कोणतीही हालचाल न दिसल्याने शेजारच्यांनी पोलिसानी खबर दिली. पोलिसनाही आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तर हॉलमध्ये निलेश ने गळफास घेतल्याचे दिसून आले. बेडरूममध्ये पत्नी व 2 मुली चे मुतदेह होते. ,त्यांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसत होते. त्यांना विष देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे दिसत होते. शवविच्छेदनासाठी मुतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आले असून उत्तम नगर पोलीस तपास करीत आहे.