ईशान्य भारताच्या विकासासाठी उद्योजकांनी पुढे यावे : नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 08:36 PM2018-09-28T20:36:56+5:302018-09-28T20:39:19+5:30

औद्योगिक क्षेत्रात देदीप्यमान प्रगती करून संपत्ती निर्माण करणा-या लोकांचा आपण निश्चित अभिमान बाळगायला हवा.

businessman should come in development of north east India : Governor Nagaland Padmanabh Acharya | ईशान्य भारताच्या विकासासाठी उद्योजकांनी पुढे यावे : नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य 

ईशान्य भारताच्या विकासासाठी उद्योजकांनी पुढे यावे : नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य 

Next
ठळक मुद्देऔद्योगिक क्षेत्रासाठीचे वार्षिक पुरस्कार प्रदान

पुणे : देशातील इतर नागरिकांचा ईशान्य भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या ईशान्य भारतीयांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथील यशस्वी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे मत नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी व्यक्त केले. 
डेक्कन चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर तर्फे (डीसीसीआयए) आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात आचार्य यांच्या हस्ते प्रकाश कोरुगेटेडचे अध्यक्ष ओम प्रकाश अगरवाल यांना डीसीसीआयए जीवनगौरव पुरस्कार, निहिलंट टेक्नोलॉजीजचे कार्यकारी उपाध्यक्ष एल. सी. सिंग यांना सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. या वेळी आचार्य बोलत होते.
डीसीसीआयचे अध्यक्ष प्रकाश धोका, उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव, सचिव रथिन सिन्हा, खजिनदार सुरिंदर अगरवाल, कार्यकारी समिती सदस्य व्ही. एल. मालू, राजीव लोकरे, कमलेश पांचाळ, मुकेश अगरवाल, अनिल गोयल, डॉ. पंडित पाळंदे, महाव्यवस्थापक संध्या कनाकिया या वेळी उपस्थित होते.  या वेळी जॉन डिअर इंडिया यांना सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ विभागासाठीचा, तर फोसेको इंडिया कंपनीस सर्वोत्कृष्ट सुरक्षा उपायांसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आचार्य म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात देदीप्यमान प्रगती करून संपत्ती निर्माण करणा-या लोकांचा आपण निश्चित अभिमान बाळगायला हवा. आपण देशाचे काही देणे लागतो हे आपण विसरता कामा नये. ईशान्य भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. तसेच उत्तम विद्यापीठेही आहेत. येथील उद्योजकांनी ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आपल्या उद्योगांच्या शाखा सुरू कराव्यात. ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहाय्य करावे.

Web Title: businessman should come in development of north east India : Governor Nagaland Padmanabh Acharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.