‘व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंवर बंदी घालावी’
By admin | Published: July 17, 2017 03:46 AM2017-07-17T03:46:53+5:302017-07-17T03:46:53+5:30
भारत व चीन सीमारेषेवरील सद्यपरिस्थितीचा ताण तणाव व दादागिरी लक्षात घेता नारायणगाव शहरातील व्यापारी बांधवानी
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : भारत व चीन सीमारेषेवरील सद्यपरिस्थितीचा ताण तणाव व दादागिरी लक्षात घेता नारायणगाव शहरातील व्यापारी बांधवानी चिनी बनावट वस्तू विक्रीस ठेवू नये, अशी मागणीचे निवेदन जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नारायणगाव व्यापारी असोसिएशनला दिले आहे .
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे ,माजी उपसरपंच संतोष वाजगे ,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रोहिदास केदारी ,तालुका युवती अध्यक्षा पुजा अडसरे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पोखरणा , जेष्ठ व्यापारी अशोक गांधी , पोपटलाल पोखरना यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमोल भुजबळ ,नवनाथ नेंद्रे,विनायक नायकवडी ,दयानंद दहिवाळ ,प्रणव संते ,कैलास बोडके ,दर्शन गाढवे ,सुयोग्य खैरे मुन्ना पठाण ,अतुल चौगुले ,सोमनाथ पडघम ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरज वाजगे म्हणाले कि सध्या चीन सैनिकांकडून सीमा रेषेवर भारतीय जवानांना दादागिरी केली जात आहे . जाणीवपूर्वक भारतीय सीमारेषा ओलांडून बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न चिनी सैनिक करीत आहेत. भारतात चिनी वस्तूची सर्वात जास्त विक्री केली जाते. सीमारेषेवरील ताण तणाव पाहता सर्व भारतीयांनी चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी बनावटीच्या वस्तू वर बहिष्कार टाकून सर्व व्यापा-यांनी वस्तू विक्री न केल्यास त्याचा फटका चीनला बसून त्यांची अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन चीनला अद्दल घडेल . यासाठी सर्व व्यापारी बंधूनी विक्री न करण्याचे आवाहन केले आहे.