बसस्टॉप हरवला आहे; शोधून देणाऱ्यास इनाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:39+5:302021-02-08T04:10:39+5:30

धायरी : सिंहगड रस्त्यावरील मुख्य रस्त्यालगत पादचारी मार्गाचे मार्च महिन्यात काम सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेले बसथांबे काढले. ...

The busstop is lost; Reward the finder | बसस्टॉप हरवला आहे; शोधून देणाऱ्यास इनाम

बसस्टॉप हरवला आहे; शोधून देणाऱ्यास इनाम

Next

धायरी : सिंहगड रस्त्यावरील मुख्य रस्त्यालगत पादचारी मार्गाचे मार्च महिन्यात काम सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेले बसथांबे काढले. मात्र, पादचारी मार्गाचे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी बसथांबे बसविले नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पूर्वी असलेल्या बस थांब्याच्या जागी अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. याबाबत शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख निलेश गिरमे यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. बसस्टॉप हरवला आहे, शोधून देणाऱ्यास योग्य इनाम दिला जाईल, अशा आशयाचे फलक शिवसेनेच्या वतीने सिंहगड रस्त्यावर लावले आहेत. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केला.

राम तोरकडी, संतोष गोरे, गणपत शहा, विजय कणसै, अदित्य वाघमारे, लोकेश राठोड व प्रवासी सहभागी झाले होते. सिंहगड रस्त्यावर पीएमपीने काढलेल्या बसथांब्यांच्या जागी चार चाकी व दुचाकी पार्क केल्याने प्रवाशांनी उभे राहायचे कुठे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या थांब्यांची जागा अतिक्रमणांनी घेतली आहे. यामुळे प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. हे बसथांबे काढल्यानंतर पीएमपी व महापालिकेने बसथांबे उभारणे आवश्‍यक असताना दुर्लक्ष होत आहे. सिंहगड रस्त्यावरील अनेक बसथांबे काढल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसून येत आहे.

कोट

सिंहगड रस्त्यावरून शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही बस थांबे काढले आहेत. पूर्वीच्या ठिकाणी असणारे बस थांबे लवकर बसवावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- निलेश गिरमे, शिवसेना विभागप्रमुख, खडकवासला

Web Title: The busstop is lost; Reward the finder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.