तेव्हा मात्र ते हप्ते घेत होते! आम्ही दोषी; तर पोलिस, एक्साइज, महापालिका निर्दोष कसे? पबमालकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 03:04 PM2024-05-26T15:04:37+5:302024-05-26T15:04:52+5:30

पबमालक नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर त्याचा अर्थ पोलिस, एक्साइज, महापालिका हेही नियम पायदळी तुडवत असतात

But then they were taking installments We are guilty So how is the police excise pune municipality innocent pune Pub owners question | तेव्हा मात्र ते हप्ते घेत होते! आम्ही दोषी; तर पोलिस, एक्साइज, महापालिका निर्दोष कसे? पबमालकांचा सवाल

तेव्हा मात्र ते हप्ते घेत होते! आम्ही दोषी; तर पोलिस, एक्साइज, महापालिका निर्दोष कसे? पबमालकांचा सवाल

पुणे : एखादी घटना घडली तर लगेच जागे होऊन आमच्या पबवर टाळे ठोकणारेच कालपर्यंत हप्ते घेत होते. त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा संतप्त सवाल काही पबमालकांनी उपस्थित केला आहे.

कल्याणीनगरमध्ये बाळाने केलेल्या अपघातानंतर पबचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. तरुणाईचे शहर मानले गेलेल्या पुण्यात पब आहेत. त्यांना मान्यता आहे. एखाद्याच्या चुकीमुळे सगळ्यांना वेठीस धरले जाते. त्याबद्दलही हरकत नाही. मात्र, पोलिस, एक्साइज, महापालिका यांच्या हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कारवाई कशी होत नाही, असा सवाल एका पबचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर विचारला आहे.

‘लोकमत’शी बोलताना हे पबमालक म्हणाले, मुळात ‘पब’ असा काही वेगळा परवाना नसतो. परमिट रूम आणि पब यांचा परवाना सारखाच असतो. जिथे म्युझिक आहे, डान्सफ्लोर आहे, त्याला ‘पब’ म्हटले जाते. पण, त्यासाठी काही तसे नियम नाहीत. आजचे नियम एवढे विचित्र आणि क्लिष्ट आहेत की पुण्यातील सर्व परमिट रूम बंद करावे लागतील. मग, आता जे सुरू आहेत, त्यांच्याकडून नियमांचे किती उल्लंघन होते, हे पाहिले जात नाही का? उद्या सगळ्याच बारना कुलूप ठोकावे लागेल. काही निवडक पबना टाळे ठोकणे बरोबर नाही, असे या मालकांचे म्हणणे आहे.

पबमालक नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर त्याचा अर्थ पोलिस, एक्साइज, महापालिका हेही नियम पायदळी तुडवत असतात. नियम बदलून बंगल्यात पब सुरू होतात, तेव्हा महापालिका काय करते, असा सवाल आहे. आज जे नियम आम्ही मोडले असे वाटते, ते इतके दिवस यांना दिसत नव्हते का? असे विचारत यंत्रणा काय करते? असेही या पबमालकांनी म्हटले आहे.

Web Title: But then they were taking installments We are guilty So how is the police excise pune municipality innocent pune Pub owners question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.