"...परंतु त्या दिवशी राहु-केतु काय डोक्यात आलं अन् १० लाख डिपॉझिट लिहिलं"; डॉ. केळकरांनी सांगितली 'प्रोसिजर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:13 IST2025-04-07T18:12:58+5:302025-04-07T18:13:48+5:30
आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असं लिहीत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असं केलं नव्हतं

"...परंतु त्या दिवशी राहु-केतु काय डोक्यात आलं अन् १० लाख डिपॉझिट लिहिलं"; डॉ. केळकरांनी सांगितली 'प्रोसिजर'
पुणे: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात १० लाख मागितल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर डॉ घैसास यांच्यावर टीकाही झाली होती. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. डिपॉझिटच्या या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने डिपॉझिट हि पॉलिसी मागील आठवड्यात रद्द केली. त्यावरून आज पुन्हा दीनानाथचे वैद्यकीय संचालक डॉ धनंजय केळकर यांनी मत व्यक्त केलं आहे. आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असं लिहीत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असं केलं नव्हतं. पण त्यादिवशी राहू केतू डोक्यात काय आलं आणि या लोकांनी डिपॉझिट लिहून दिलं काय माहित नाही. अशी प्रतिक्रिया केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
केळकर म्हणाले, डिपॉझिट सगळ्यांकडून घेत नाही. गरीब लोकांकडून तर अजिबातच घेत नव्हतो. ज्यांना जमेल त्यांना पैसे मागितले जात होते. पण या प्रकरणानंतर आम्ही डिपॉझिट हि पॉलिसी रद्द केली आहे. इथून पुढे ती घेतली जाणार नाही. त्यादिवशी असं काय झालं यांनी कागदावर डिपॉझिट लिहून दिल हे माहित नाही.
सुश्रुत घैसास हे कन्सल्टन्ट म्हणून १० वर्षे काम करत आहेत. त्यांनी दडपणाखाली वागत असून, धमक्यांचे फोन पाहता मी राजीनामा देत आहे. मला व्यवस्थित काम करता येणार नाही. म्हणून राजीनामा देत आहे असे त्यांनी पत्रकात लिहून देऊन आमच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे . गुरुवारी ते पदमुक्त होणार आहेत. स्टाफच्या बोलण्याची पद्धत व्यवस्थित नाही. ती आम्ही ट्रेनिंग सुरु केली आहे. शासकीय अहवाल ३ येणार आहेत. ते सर्व अहवाल आल्यावर त्यावर अभ्यास करून मत व्यक्त करण्यात येईल. आम्ही कोर्टात पैसे भरतो. मनपाचा टॅक्स थकला नाही. नाहीतर त्यांनी बंदच केलं असत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आम्ही कोर्टात टॅक्स भरतोयअसेही त्यांनी सांगितले आहे.