लोणी काळभोरला हातभट्ट्यांवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:38+5:302021-06-20T04:09:38+5:30

आशा शिवाजी तरंगे (वय ३५, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन), लता अरविंद रजपूत, (वय ४२, रा. गोळीबार मैदान, दत्तवाडी, उरुळी ...

Butter blackberries on hand kilns | लोणी काळभोरला हातभट्ट्यांवर छापा

लोणी काळभोरला हातभट्ट्यांवर छापा

Next

आशा शिवाजी तरंगे (वय ३५, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन), लता अरविंद रजपूत, (वय ४२, रा. गोळीबार मैदान, दत्तवाडी, उरुळी कांचन), सावन सुरेश बिरे (वय ३५, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर), राधेशाम हरीराम प्रजापती (वय ३०, रा. बगाडे मळा, दत्तवाडी, उरुळी कांचन) यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार: लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टीची दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी (दि. १८) विशेष मोहीम राबवून कारवाई केली. दत्तवाडी, उरुळी कांचन येथील पुनर्वसन शेतजमिनीमध्ये आशा तरंगे ही महिला चालवित असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकून दारू निर्मितीसाठी तयार केलेले १ हजार लिटर कच्चे रसायन व इतर साधणे असा मिळून एकूण ४६ हजार रुपये किमतीचा माल व

साधणे जप्त करून नष्ट करण्यात आली आहेत. तर उरुळी कांचन ते भवरापूरकडे जाणाऱ्या

ओढ्याच्या कडेला लता रजपूत या चालवित असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकून तेथील ७०० लिटर कच्चे रसायन व इतर साधणे असा मिळून एकुण ३२ हजार रुपये किमतीचा माल व साधणे जप्त करून नष्ट करण्यात आली आहेत.

याचबरोबर रुपनवरवस्ती, लोणी काळभोर येथे नवीन मुठा उजवा कालव्याचे बाजूला सावन बिरे, हातभट्टीवरील छाप्यात ७०० लिटर कच्चे रसायनासह व इतर साधणे असा एकूण १४ हजार रुपये किमतीचा तर पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे येथिल शिंदवणे ते उरुळी कांचनकडे येणाऱ्या

ओढ्याच्या कडेला राधेशाम प्रजापती हा चालवित असलेल्या हातभट्टीवरील कारवाईत दारू १ हजार लिटर कच्चे रसायनासह इतर साधणे असा एकूण ४५ हजार रुपये किमतीच माल नष्ट करण्यात आला आहे.

Web Title: Butter blackberries on hand kilns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.