भयंकर! लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण; पत्नी अन् बाळाचा निर्घृण खून करत एकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:18 PM2021-05-10T13:18:33+5:302021-05-10T15:11:59+5:30

लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक टंचाईस कंटाळून संपवले जीवन

Butter trembled forever! One committed suicide by killing his wife and child | भयंकर! लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण; पत्नी अन् बाळाचा निर्घृण खून करत एकाची आत्महत्या

भयंकर! लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण; पत्नी अन् बाळाचा निर्घृण खून करत एकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देआर्थिक अडचणीने पती पत्नीत किरकोळ वाद

लोणी काळभोर :कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक टंचाईला कंटाळून एकाने त्याची पत्नी व १ वर्षे २ महिने वयाच्या लहान मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार कदमवाकवस्ती ( ता हवेली ) ग्रामपंचायत हद्दीत घडला आहे.

हनुमंत दर्याप्पा शिंदे ( वय ३८, सध्या रा. कदमवाकवस्ती ) याने पत्नी प्रज्ञा ( वय २८ ) हिचा गळा आवळून तर लहान मुलगा शिवतेज ( वय १ वर्षे २ महीने ) याचा धारदार सुरीने गळा चिरून खुन करून नंतर स्वतः ओढणीच्या सहाय्याने बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी हनुमंत याचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे ( वय ६२ ) यांनी फिर्याद दिली आहे.   हनुमंत हा सिमेंटचे टेम्पोवर ड्रायव्हर म्हणुन कामास होता. त्याची पत्नी प्रज्ञा ही घरकाम करून घरामध्ये शिवणकाम करत होती. हनुमंत यास लॉकडाउनमुळे काम नसल्याने गेल्या आठ दिवसापासून तो घरी होता. आर्थिक अडचणीने पती पत्नीत किरकोळ वाद होत असत.

दर्याप्पा यांचे एकत्रित कुटुंब आहे. रविवार ९ मेला दर्याप्पा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यावेळी नातू प्रथमेश व नात ईश्वरी हे हॉलमध्ये टी.व्ही पाहत बसले होते. तर मुलगा हनुमंत व सुन प्रज्ञा व नातु शिवतेज हे त्यांच्या बेडरूममध्ये होते. बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. मुलगा व सुन हे नेहमी दुपारी जेवण झाल्यावर बेडरूममध्ये झोपतात. त्यामुळे ते बाहेरच थांबले. दुपार उलटुन गेल्यानंतरही मुलगा व सुन बेडरूममधून बाहेर आले नाहीत.

संध्याकाळी मुलगी जयश्री किसन मोरेचा प्रज्ञाला फोन आला. परंतु प्रज्ञा बेडरूममधून बाहेर आली नसल्याने फोन नातू प्रथमेश याने उचलला. मोबाईल प्रज्ञाकडे देण्यास सांगितल्यावर त्याने बेडरूमचा दरवाजा वाजवला. परंतु आतून कोणीही दरवाजा उघडला नाही.  रात्री ८ वाजेपर्यंत मुलांनी खुप वेळा बेडरूमचा दरवाजा वाजवूनही उघडला नाही. दर्याप्पा यांचा भाचा, जावई व धाकटा मुलगा हे घरी आले. सर्वानी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच आवाज येत नसल्याने आजुबाजुचे लोक तेथे जमा झाले. त्यापैकी चेतन काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे फोन करून पोलीसांना माहिती दिली. पोलीस रात्री ९ - ३० वाजण्याच्या सुमारांस तेथे पोहोचले. त्यांनी बेडरूमच्या पश्चिमेकडील खिडकीच्या जाळीमधून आत डोकावून पाहीले असता हनुमंत हा बेडरूम मधील पंख्याला गळफास घेवुन लटकत असलेला दिसला. म्हणून पोलिसांनी जमलेल्या लोकांच्या मदतीने एक बांबूची काठी घेऊन दरवाजाची कडी आतल्या बाजुने वर उचलली. त्यानंतर आत जाऊन पाहिल्यावर प्रज्ञा मृत अवस्थेत होती. तर तिच्या शेजारी नातू शिवतेज याच्या गळयावर धारदार सुरीने कापल्याने तो ही मृत असल्याचे दिसले. मृतदेहाची पाहणी करून त्यांचा मृत्यु झाल्याची खात्री झाल्याने पंचनामा करून तीनही मृतदेह ससूनला पाठवण्यात आले.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर भाग्यश्री नवटके आणि त्यांच्या पथकाने भेट दिली असून ते पुढील तपास करत आहेत.

Web Title: Butter trembled forever! One committed suicide by killing his wife and child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.