शासनाची वाट न पाहता लस खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:07+5:302021-05-05T04:15:07+5:30
पुणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी तात्कालिक उपाययोजना करण्याऐवजी दूरगामी तोडगा काढावा. त्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे ...
पुणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी तात्कालिक उपाययोजना करण्याऐवजी दूरगामी तोडगा काढावा. त्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेने शासनावर अवलंबून राहणे सोडून स्वतःच लस खरेदी करावी, अशी मागणी शहर शिवसेनेने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लस खरेदी करण्यासाठी २०० कोटी रुपयांची आवश्यकता असून तातडीने अनावश्यक कामे थांबविण्यात यावीत, असे निवेदन शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे सहसंपर्कप्रमुख शाम देशपांडे, प्रशांत बधे यांच्यावतीने देण्यात आले.
शहर हाॅटस्पॉट बनले असून विकासकामे महत्त्वाची असली तरी नागरिकांचे जीव वाचविणे व सार्वजनिक आरोग्य सुस्थितीत ठेवणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे अनावश्यक विकासकामे थांबवून २०० कोटींच्या लस खरेदी कराव्यात. त्यासाठी जी कंपनी लस देण्यास तयार असेल त्यांच्याशी तातडीने करार करावा, असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.