खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:31+5:302020-12-17T04:37:31+5:30
राजगुरूनगर: खेड घाटातील बाह्यवळण रस्ता अपुर्ण कामामुळे खुला होण्यास फ्रेबुवारी २०२१ उजाडणार असल्याचे चित्र दिसत आहे. तोपर्यत वाहनचालकांना ...
राजगुरूनगर: खेड घाटातील बाह्यवळण रस्ता अपुर्ण कामामुळे खुला होण्यास फ्रेबुवारी २०२१ उजाडणार असल्याचे चित्र दिसत आहे. तोपर्यत वाहनचालकांना जुन्या घाट रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.
खेड घाटातील बाह्यवळण रस्ता प्रशस्त बनविण्यात आला आहे. डांबरीकरण पुर्ण झाले आहे. पुर्णपणे रस्त्याचे काम पुर्ण होऊन दिवाळीत वाहतुकीस खुला होईल असे ठेकेदाराने अश्वासन दिले होते. मात्र युध्दपातळीवर काम असताना रस्त्यांची अनेक कामे अपूर्ण आहेत. रस्ता डोंगरातुन खोदल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यालगतच्या दरडी कोसळण्याच्या अवस्थेत आहे. त्या ठिकाणी धोकादायक दरडी काढून त्या ठिकाणी जाळी मारून सिमेटीकरण सुरू आहे.रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यालगतच्या मोऱ्याची कामे सुरु आहेत. रस्त्याच्या दुर्तफा फुलझाडे लावण्याचे काम तसेच धोकादायक ठिकाणी सरंक्षक कठडे उभारणे आदी कामे अपुर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे अजुन दोन महिने तरी रस्त्याची कामे पुर्ण होण्यास लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
खेड घाटाच्या कामामध्ये तुकाईवाडी हद्दीतील झणझणस्थळ येथे सुमारे ३०० मीटर रस्त्यासह ८० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाची उभारणी झाली आहे. या पुलाची उंची ८ मीटर तर रुंदी ११ मीटर आहे पुलाखालून भुयारी मार्गाद्वारे स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोय करण्यात आली आहे..हा बाह्यवळण रस्ता खुला झाल्यानंतर पुणे -नाशिक महामार्गावरील खेड घाटात वारंवार होणारी वाहतुक थांबणार आहे. तसेच मालवाहतुक ट्रक बंद घाटात बंद पडणे, अपघात होणे त्यामुळे पोलिसांची वाढती डोकेदुखी थांबणार आहे.
१६राजगुरुनगर
१६ राजगुरुनगर १
खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे उर्वरीत काम युध्दपातळीवर सुरु आहे.