सीए परीक्षेचा निकाल शुक्रवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 07:39 PM2018-07-19T19:39:17+5:302018-07-19T19:46:31+5:30
‘आयसीएआय’मार्फत सीएची अंतिम परीक्षा मे महिन्यात तर अन्य दोन परीक्षा जुन महिन्यात घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे.
पुणे : दि इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाऊटंन्टस् आॅफ इंडिया (आयसीएआय)च्या वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए)च्या अंतिम परीक्षेसह पायाभुत (फाऊंडेशन) व सामायिक प्राविण्य परीक्षेचा (सीपीटी) निकाल शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ‘आयसीएआय’ संकेतस्थळासह ई-मेल व एसएमएसद्वारेही निकाल मिळणार आहेत.
‘आयसीएआय’मार्फत सीएची अंतिम परीक्षा मे महिन्यात तर अन्य दोन परीक्षा जुन महिन्यात घेण्यात आल्या होत्या. अंतिम परीक्षेच्या जुन्या अभ्यासक्रमासाठी १ लाख २१ हजार ८५० तर नवीन अभ्यासक्रमासाठी ५ हजार ४०६ विद्यार्थी बसले होते. तर सीपीटी परीक्षा ५७ हजार ४२१ व पायाभुत परीक्षा ६ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी दिली आहे. संस्थेकडून निकाल जाहीर करताना पहिल्या ५० विद्यार्थ्यांची देशपातळीवरील गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ही यादी संकेतस्थळावर उपलब्ध असेल. संकेतस्थळावर पुर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या ई-मेलवरही निकाल पाठविले जाणार आहे. निकालासाठी तीन संकेतस्थळ देण्यात आली असून त्यावर विद्यार्थ्यांना बैठक क्रमांकासह नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक टाकून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल मोबाईलवर कळणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
--------------
एसएमएसद्वारे निकाल - अंतिम परीक्षा - CAFNLNEW
CAFND
- CACPT
पायाभुत परीक्षा -
सीपीटी -
यापुढे बैठक क्रमांक टाकून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा.
-------------------------
निकालासाठी संकेतस्थळ -
www.icaiexam.icai.org
www.caresults.icai.org
www.icai.nic.in
-----------