वडीपाट बंद टोल नाक्यावरील केबिन धोकादायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:12 AM2021-03-21T04:12:10+5:302021-03-21T04:12:10+5:30
पंढरीनाथ नामुगडे -- कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट टोलनाका बंद झाल्याने टोलचे रिकामे केबिन धोकादायक बनत चाललेले ...
पंढरीनाथ नामुगडे
--
कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट टोलनाका बंद झाल्याने टोलचे रिकामे केबिन धोकादायक बनत चाललेले आहेत. वेळोवेेळी ही अडचण प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील त्याठिकाणावरील धोकादायक केबिन काढले जात नाही. त्यामुळे येथे मोठा अपघात संभवतो आहे.
येथील टोल नाक्यावरील एक केबिन धोकादायक रित्या महामार्गावर कलले आहे. त्यामुळे वाहन जाताना त्याच्या हदऱ्याने ते केव्हाही एखाद्या वाहनावर कोसळू शकते किंवा वाहनाला त्याचा धक्का बसूनही वाहनाचा अपघात होऊ शकतो. याबाबत वर्तमान पत्रात वृत्त प्रसिद्ध होऊनही प्रसाशनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
केबीन लोखंडाची असून त्याला गंज चढत आहे. त्यामुळे ती अतिशय कमकुवत झाली आहे. त्यामुळे या बंद टोलनाक्याचे केबीन काढून टाकायची मागणी नागरिक करीत आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते यवत या पर्यंतचा रस्ता आयआरबी कंपनीकडे होता. त्यानंतर कंपनीचा कार्यकाळ संपल्यावर तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांनतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे या महामार्गावर दुर्लक्ष असल्याने या महामार्गावर बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत. ज्यातून मोठे अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे-सोलापूर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्यानंतर याकडे या विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे.
--
प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याव देखभाल दुरुस्ती नाहीच
पुणे शहराला जोडणाऱ्या सर्वच महामार्गांचे रुंदीकरण
करण्यात आले. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरीत’ करा या तत्वावर सन २००३ मध्ये पुणे सोलापूर महामार्गाचे
रुंदीकरण करण्यात आले पहिल्या टप्प्यात कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी इथपर्यंत सत्त२७ कि.मी.चा हा टप्पा पूर्ण झाला. या महामार्गावर आय आर बी कंपनीकडून सन २०१९ पर्यंत टोल वसूल करण्यात आला त्यानंतर हा मार्ग
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्यानंतर जवळपास दीड वर्ष उलटून गेले परंतु त्यानंतर या मार्गाची कसलीच देखभाल केलीच नाही असे चित्र आहे. अनेक ठिकाणी दुभाजकाची उंची चिखलामुळे खुपच कमी झाल्याने अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत. रस्ता ओलांडून पलिकडील रस्त्यावर वाहनांवर आढळत आहेत. तसेच जाळ्या तुटून त्या धोकादायक पध्दतीने सेवा रस्त्यावर आलेल्या आहेत.यावरुन याची देखभाल करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही हे निदर्शनास येत आहे.
----पू
२० कदमवाकवस्ती कवडीपाट टोल नाका
फोटो ओळी :कवडीपाट येथील बंद असलेल्या टोलनाक्याची धोकादायक केबिन.