कवडी पाट बंद टोलनाक्याची केबिन अपघातास ठरतायेत कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:16 AM2021-02-18T04:16:29+5:302021-02-18T04:16:29+5:30
कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट टोलनाका बंद झाल्याने टोलचे रिकामे केबिन धोकादायक बनत चाललेले आहेत. त्याठिकाणी घाणीचे ...
कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट टोलनाका बंद झाल्याने टोलचे रिकामे केबिन धोकादायक बनत चाललेले आहेत. त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून टोलनाका हा फक्त वाढदिवसाचे फ्लेक्स व व्यवसायांच्या जाहिराती लावण्यासाठी राहिलेला आहे. याठिकाणी असलेले लोखंडचे केबिन गंजू लागल्याने ते कधीही महामार्गावर पडून मोठा अपघातास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे हा बंद टोलनाक्याचे केबीन काढून टाकायची मागणी नागरिक करीत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते यवत यापर्यंतचा रस्ता आयआरबी कंपनीकडे होता. त्यानंतर कंपनीचा कार्यकाळ संपल्यावर तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांनतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे आहे.परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे या महामार्गावर दुर्लक्ष असल्याने या महामार्गावर बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत.ज्यातून मोठे अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे-सोलापूर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्यानंतर याकडे या विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे आणि यावर संबंधित विभागाचा अधिकारी फिरकलाच की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण या महामार्गावर अनेक ठिकाणी काटेरी झुडपांनी आपले बस्तान वाढवलेले
आहे. पुणे शहराला जोडणाऱ्या सर्वच महामार्गांचे रुंदीकरण
करण्यात आले. बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा या
तत्त्वावर सन २००३ मध्ये पुणे सोलापूर महामार्गाचे
रुंदीकरण करण्यात आले पहिल्या टप्प्यात कवडीपाट
टोलनाका ते कासुर्डी इथपर्यंत सत्तावीस किमीचा हा
टप्पा पूर्ण झाला.या महामार्गावर आयआरबी कंपनीकडून सन २०१९ पर्यंत टोल वसूल करण्यात आला, त्यानंतर हा मार्ग
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्यानंतर जवळपास दीड वर्ष उलटून गेले परंतु त्यानंतर या मार्गाची कसलीच देखभाल केलीच नाही असे चित्र आहे.अनेक ठिकाणी दुभाजकाची उंची चिखलामुळे खूपच कमी झाल्याने अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत. रस्ता ओलांडून पलीकडील रस्त्यावर वाहनांवर आढळत आहेत. तसेच जाळ्या तुटून त्या धोकादायक पद्धतीने सेवा रस्त्यावर आलेल्या आहेत.यावरून याची देखभाल करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही.हे निदर्शनास येत आहे.
कवडीपाट येथील बंद असलेल्या टोलनाक्याची धोकादायक केबिन.