दोन लाखांच्या मुद्येमालासह केबलचोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:51+5:302021-06-18T04:08:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : एमआयडीसीतील एका कंपनीच्या आवारातून केबल चोरलेल्या केबलप्रकरणी केबलचोरांना ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : एमआयडीसीतील एका कंपनीच्या आवारातून केबल चोरलेल्या केबलप्रकरणी केबलचोरांना ग्रामीण पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोघांना २ लाख १० हजारांच्या केबलसह अटक केली आहे.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सचिन भिका गिरनारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू सलिम गायकवाड (वय २४, रा. प्रबुद्धनगर, आमराई) व संग्राम उर्फ झिंगाट हनुमंत साळुंखे (वय २०, रा. आमराई) या दोघांना अटक करण्यात आली आहे. गिरनारे हे औरंगाबादच्या तोशिवा सोलार प्रा. लि. कंपनीत काम करतात. बारामती एमआयडीसीतील वरसा प्लास्टिक प्रा. लि. कंपनीच्या छतावर सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी ते बारामतीत काही दिवसांसाठी आले आहेत. सोमवारी (दि १४) कंपनीच्या मोकळ्या जागेत त्यांनी कामासाठी आणलेली २ लाख १३ हजार रुपयांची केबल उतरवून घेतली. दिवसभर काम केल्यानंतर अल्ताफ शेख व परमेश्वर साळुंखे या दोघा वॉचमनला साहित्यावर लक्ष ठेवायला सांगून ते घरी आले. दुसऱ्या दिवशी वॉचमनने येथून केबल चोरीला गेली असल्याचे फिर्यादीला कळवले. घटनास्थळी जात पाहणी केली असता पॉलिकॅब कंपनीच्या केबलची बंडले अज्ञाताने चोरून नेल्याचे दिसून आले होते.पोलिसांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढत आरोपींना अटक केली आहे.
फोटो ओळी : बारामती एमआयडीसीत कंपनीतील केबल चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींसह पोलीस अधिकारी-कर्मचारी
१७०६२०२१-बारामती-१२