कॅडेन्सचे साताराविरुद्ध वर्चस्व
By Admin | Published: May 8, 2017 03:22 AM2017-05-08T03:22:04+5:302017-05-08T03:22:04+5:30
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १९ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत मालवण येथे झालेल्या लढतीत कॅडेन्सने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १९ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत मालवण येथे झालेल्या लढतीत कॅडेन्सने सातारा संघाविरुद्ध वर्चस्व राखले.
कॅडेन्सने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद २१८ धावा केल्या. त्यांच्याकडून हर्षल काटेने १११ व अजिंक्य गायकवाडने ३५ धावा केल्या. सातारा संघाकडून रोहन थोरातने ५ व आकाश जाधवने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात सातारा संघ १७३ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून आकाश जाधवने ७३ व सिद्धांत दोशीने ३८ धावा केल्या. कॅडेन्सकडून वैभव विभूतेने ४ गडी बाद केले. पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या कॅडेन्सने दुसऱ्या डावात ६ बाद १०१ धावा केल्या. त्यांच्याकडून शुभम हरपाळेने २७ धावा केल्या. साताराकडून रोहन थोरातने ३४ धावांत ३ गडी बाद केले.
पूना क्लबने स्टार सी. सी.विरुद्ध पहिल्या डावात ४२८ धावा केल्या. त्यांच्याकडून रुचिर गमांदे याने १०६ व कौस्तव करण याने ८७ धावा केल्या. स्टार सी. सी.कडून तौफिकने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात स्टार सी. सी. संघ ९० धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अर्जुन देशमुखने सर्वाधिक ४० धावा केल्या. पूना क्लबकडून प्रेम जाधवने ९ धावांत ४ गडी बाद केले. फॉलोआॅन घेऊन खेळणाऱ्या स्टार सी. सी.ने दुसऱ्या डावात ८ बाद १८२ धावा केल्या. त्यांच्याकडून अभिषेक पुजारी व आराध्य पाध्ये यांनी प्रत्येकी २१ धावा केल्या. पूना क्लबकडून प्रकाश चौधरीने ३ गडी बाद केले. हा सामना अनिर्णीत राहिला.
एमसीव्हीएस व नाशिक यांच्यातील लढत अनिर्णीत झाली. नाशिकने घरच्या मैदानावर पहिल्या डावात २४१ धावा केल्या. त्यांच्याकडून निखिल जोशीने ८६ व सिद्धार्थ नक्का याने ८१ धावा केल्या. एमसीव्हीएसकडून सात्त्विक सातपुतेने ४ व शुभम शुक्लाने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमसीव्हीएसने पहिल्या डावात २१४ धावा केल्या. त्यांच्याकडून शुभम यवतीकरने ९१ व अमित यादवने ५३ धावा केल्या. तन्मय शिरोडेने ५४ धावांत ५ गडी बाद केले.
सोलापूर येथे पुणे येथील अॅम्बिशस आणि सांगली यांच्यातील लढतही अनिर्णीत राहिली. सांगलीने प्रथम फलंदाजी करीत पहिल्या डावात १७८ धावा केल्या. त्यांच्याकडून प्रथमेश भोसलेने ३८ धावा केल्या. अॅम्बिशसकडून अभय यादवने ४० धावांत ८ गडी बाद केले. प्रत्युत्तरात अॅम्बिशस पुणेने २७० धावा केल्य. त्यांच्याकडून सौरभ हादकेने ५७ धावा केल्या. सोलापूरने घरच्या मैदानावर पुणे येथील क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीविरुद्ध पहिल्या डावात २१४ धावा केल्या. त्यांच्याकडून सलील रितेशने नाबाद ४४ व शंतनूकुमारने ३१ व प्रीतेश तिवारीने ३७ धावा केल्या. सीएमएकडून नचिकेत वेर्लेकरने ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात सीएमए संघ ९६ धावांत गारद झाला. सोलापूरकडून शिरीष अकलूजकरने ४ गडी बाद केले. फॉलोआॅननंतर सोलापूरने सीएमएचा दुसरा डाव ११४ धावांत गुंडाळताना एक डाव व ४ धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
कॅडेन्स (पहिला डाव) : २१८. (हर्षल काटे १११, अजिंक्य गायकवाड ३५. रोहन थोरात ५/५९, आकाश जाधव ३/४५). दुसरा डाव : ६ बाद १0१. (निपुण गायकवाड १७, शुभम हरपाळे २७, रोहन थोरात ३/३४) अनिर्णीत वि. सातारा पहिला डाव : सर्व बाद १७३. (आकाश दोशी ७३, सिद्धांत दोशी ३८, वैभव विभूते ४/४0, यतीन मंगवाणी २/३१).
पूना क्लब (पहिला डाव) ८९.५ षटकांत सर्व बाद ४२८. (रुचिर गमांदे १0६, कौस्तव करण ८७, आर्यमन पिल्ले ७८, तौफिक सय्यद ३/७५). स्टार सी. सी. (पहिला डाव) : ३२ षटकांत सर्व बाद ९0. (अर्जुन देशमुख ४0, प्रेम जाधव ४/९). दुसरा डाव : ८ बाद १८२. (आदित्य मगर ८६. प्रकाश चौधरी ३/३९).