आंतरक्लब निमंत्रित क्रिकेटमध्ये ‘केडन्स’चा सलग दुसरा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:11 AM2021-01-21T04:11:04+5:302021-01-21T04:11:04+5:30
पुणे : पाथ-वे फाउंडेशनच्या वतीने आयोजित एम ३ करंडक आंतर क्लब २३ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गटसाखळी फेरीत अजिंक्य ...
पुणे : पाथ-वे फाउंडेशनच्या वतीने आयोजित एम ३ करंडक आंतर क्लब २३ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गटसाखळी फेरीत अजिंक्य गायकवाड (१०९)च्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा १६६ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. दुसऱ्या सामन्यात सचिन भोसले (५-३९ व नाबाद ४६) याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा ४ गडी राखून पराभव केला. सामन्याचा मानकरी शतकी खेळी करणारा अजिंक्य गायकवाड ठरला.
डीव्हीसीए मैदानावरील लढतीत अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. भेदक गोलंदाजीपुढे व्हेरॉक क्रिकेट अकादमीचा डाव २०७ धावावर कोसळला. हे आव्हान अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने ३८.५ षटकांत ६ बाद २०८ धावा करून पूर्ण केले. अष्टपैलू कामगिरी करणारा सचिन भोसले सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : गटसाखळी फेरी :
केडन्स क्रिकेट अकादमी : ४५ षटकांत ९ बाद ३१० धावा. अजिंक्य गायकवाड १०९, अथर्व काळे ६२, निपुण गायकवाड ४५, सिद्धेश वरघंटी ३२, अर्शिन कुलकर्णी २४, कौशल तांबे १५, साहिल चुरी ४-५३, यश खळदकर ३-५१, आकाश जाधव १-६२
वि. वि. पीवायसी हिंदू जिमखाना : ३५.१ षटकांत सर्वबाद १४४ धावा. अखिलेश गवळी ४४, श्रेयश वाळेकर ३०, साहिल चुरी २२, यश खळदकर नाबाद १३, शुभम हरपाळे ३-३१, सिद्धेश वरघंटी २-४१, अजिंक्य गायकवाड १-६, इझान सय्यद १-२७, यतीन मंगवाणी १-२६ ; सामनावीर - अजिंक्य गायकवाड; केडन्स क्रिकेट अकादमी १६६ धावांनी विजयी.
व्हेरॉक क्रिकेट अकादमी : ४०.२. षटकात सर्वबाद २०७ धावा. पवन शहा ६६, ओम भोसले २९, मिझान सय्यद २४, तिलक जाधव २०, रोहित चौधरी २०, कपिल गायकवाड १७, राहुल वारे १६, सचिन भोसले ५-३९, वैभव विभुते ४-४३, व्यंकटेश दराडे १-२१ पराभूत वि. अँबिशियस क्रिकेट अकादमी : ३८.५ षटकात ६ बाद २०८ धावा. सचिन भोसले नाबाद ४६, व्यंकटेश दराडे नाबाद ४६, अनिकेत पोरवाल ३९, सिद्धांत दोशी २९, हृषीकेश बारणे १४, सुरज परदेशी १३, तिलक जाधव ३-१९, रोहित चौधरी २-३८, कपिल गायकवाड १-३२; सामनावीर - सचिन भोसले; अँबिशियस क्रिकेट अकादमी ४ गडी राखून विजयी.