बिबट्याच्या दहशतीने घरांचेच झाले ‘पिंजरे’

By Admin | Published: September 27, 2015 01:02 AM2015-09-27T01:02:12+5:302015-09-27T01:02:12+5:30

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावणे ही तर नित्याची बाब झाली आहे, परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे सुरक्षिततेसाठी अनेक ठिकाणी लोकांनी त्यांच्या

'Cage' by house of leopard | बिबट्याच्या दहशतीने घरांचेच झाले ‘पिंजरे’

बिबट्याच्या दहशतीने घरांचेच झाले ‘पिंजरे’

googlenewsNext

पराग जगताप , मढ
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावणे ही तर नित्याची बाब झाली आहे, परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे सुरक्षिततेसाठी अनेक ठिकाणी लोकांनी त्यांच्या घरांना व गोठ्यांनाही लोखंडी जाळ्या लावून पॅकबंद केले आहे. त्यामुळे आता बिबट्याला पिंजऱ्यात कोंडू पाहणाऱ्या लोकांवरच सुरक्षित पिंजऱ्यात राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
जुन्नर तालुक्यातील पांगरी तर्फे मढ येथे सखुबाई वारे या महिलेला बिबट्याने ठार केल्यापासून बिबट्याची गत दहा महिन्यांपासून या परिसरात दहशत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात या भागात दोन महिला व दोन बालकांना जीव गमवावा लागला आहे. या दहा महिन्यांच्या काळात वन विभागानेही जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली. या परिसरातून त्यांनी पाच बिबटे जेरबंद केले. डिंगोरे परिसरात दोन मृत बिबटे आढळून आले. वन विभागाकडूुन डिंगोरे, पिंपळगाव जोगा, पांगरी तर्फे मढ, भोईरवाडी, उदापूर, ओतूर, खामुंडी या परिसरात रात्रीची गस्तही घालण्यात आली. चल्चित्र, पोस्टर, व्याख्याने याद्वारे बिबट्याप्रवण क्षेत्रात फिरताना घ्यावयाच्या काळजीबाबत गावोगाव मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनाही बिबट्या शेतात दिसल्यावर काय करावे, बिबट्याने हल्ला केला तर पुढे काय खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती मिळाली.

Web Title: 'Cage' by house of leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.