सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोटयावधींच्या अनावश्यक खर्चांवर कॅगचे गंभीर आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:46 PM2019-04-20T12:46:05+5:302019-04-20T12:51:45+5:30
१ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीमधील आर्थिक व्यवहारांचे कॅगकडून लेखा परीक्षण करण्यात आले आहे.
- दीपक जाधव-
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीमधील आर्थिक व्यवहारांचे कॅगकडून लेखा परीक्षण करण्यात आले असून यामध्ये बांधकामे, मुद्रणालय, दगडी भिंतीचे बांधकाम, पदनाम वेतनश्रेण्यांसाठी पैसे उचलणे, विद्यार्थी सुविधा केंद्राचे रखडलेले बांधकाम आदी अनेक बाबींवर कोटयवधींचा अनावश्यक खर्च केल्याचे तसेच विलंब केल्याने तोटा झाल्याचे गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. याबाबत अधिसभा काय भुमिका घेणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वषार्चा वार्षिक अर्थसंकल्प शनिवार, दि. २० एप्रिल २०१९ रोजी अधिसभेसमोर मांडला आहे. २०१२ ते २०१६ या वषार्तील आर्थिक व्यवहारांचे लेखा परीक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल विद्यापीठाला सादर करण्यात आला आहे. त्याबाबतचा कृती अहवालही विद्यापीठ प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. नुकताच तो विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. मात्र याबाबत अधिसभेत अथवा व्यवस्थापन परिषदेमध्ये अद्याप चर्चा झालेली नाही. शनिवारी सादर होणाºया अर्थसंकल्पाच्या अधिसभेत याबाबत सदस्यांकडून चर्चा होणार का याकडे लक्ष लागले आहे.
मुद्रणालयाच्या उत्पन्नापेक्षा ८२ पटींनी जादा खर्च
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्वत:चे मुद्रणालय आहे. या विद्यापीठाच्या कामकाजासंबंधी बहुतांश छपाई या मुद्रणालयातून होत होती. मात्र नंतरच्या काळात मुद्रणालयाचे आधुनिकरण न करता विद्यापीठातील छपाईची बहुतांश कामे आऊटसोर्स केली जात आहेत. कॅगच्या अहवालानुसार सन २०१४ ते २०१५ या काळात उत्पन्नापेक्षा ८२ पटीने जादा खर्च मुद्रणालयावर झाला आहे. सन २०१३ ते २०१६ या काळात मुद्रणालयास ३.९ कोटी रूपयांचा तोटा झाल्याचे या अहवालात नमूद केले आहे. उत्तरपत्रिकांसाठी बारकोड पध्दत लागू केल्याने खर्चात वाढ झाल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.
अंतर्गत दगडी बांधकामांवर कोटयावधींचा खर्च
विद्यापीठातील अनेक विभाग, पुतळे यांना सीमा भिंती घालण्यासाठी दगडी बांधकाम करून कोटयावधी रूपयांचा खर्च करण्यात आला. वस्तूत: विद्यापीठाच्या चार बाजूंच्या सिमा भिंती मजबूत करण्याची आवश्यकता असताना विभाग, इमारती, पुतळे यांच्या भोवती दगडी बांधकाम करण्यात आले. सन २०१२ ते २०१६ या कालावधीमध्ये यावर १० कोटी रुपए खर्च करण्यात आले आहे. यावर कॅगकडून आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
.....
राज्यपालांकडे कृती अहवाल पाठविला
कॅगचा २०१२ ते २०१६ चा लेखा परीक्षण अहवाल व त्याबाबतचा विद्यापीठाचा कृती अहवाल विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
सीए अतुल पाटणकर, वित्त व लेखाअधिकारी
......
विद्यापीठात सन २०१२ ते २०१६ या कालावधीमध्ये मोठयाप्रमाणात इमारतींचे बांधकाम झाले. या बांधकामाला विलंब होणे व इतर अनेक कारणांनी विद्यापीठाचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अ?ॅकॅडमिक स्टाफ कॉलेज गेस्ट हाऊस, कॅप भवन, प्लेसमेंट सेल बिल्डिंग, लायब्ररी बिल्डिंग आदींच्या बांधकामाबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
...............
कॅगच्या अहवालातील इतर आक्षेप
- पेन्शन स्कीम मध्ये ११. ५४ कोटी रुपए पगारातून कापले नाही
- कर्मचारी वसाहतीच्या गैरवापरामुळे १२.५० लाख रूपयांचे नुकसान
- अंतर्गत लेखा परीक्षण कक्ष अकार्यक्षम
- नगर येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या जमिनीवर अतिक्रमण
- राज्य शासनाच्या परवानगी शिवाय कॉन्ट्रॅक्टवर अधिकारी व कर्मचारी नियुक्ती
- ठेकेदारांना दिलेल्या अ?ॅडव्हान्सची रक्कम परत न घेणे
- सोलर पॉवर खरेदीमध्ये पारदर्शक नाही
राज्यपालांकडे कृती अहवाल पाठविला