योगेश टिळेकरांच्या नावाने पालिका उपायुक्तांना कॉल, एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:10 AM2021-07-31T04:10:34+5:302021-07-31T04:10:34+5:30
पुणे : माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नावाने महानगरपालिकेच्या उपायुक्तांना दूरध्वनी करून शेंडगे नामक कोरोनाबाधिताला बेड उपलब्ध करून ...
पुणे : माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नावाने महानगरपालिकेच्या उपायुक्तांना दूरध्वनी करून शेंडगे नामक कोरोनाबाधिताला बेड उपलब्ध करून देण्यास सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमाकांत शेंडगे असे त्याचे नाव असून ही घटना २ एप्रिलला घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोंढवा बुद्रुक परिसरातील रमाकांत शेंडगे यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी २ एप्रिलला महापालिकेचे उपायुक्तांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी शेंडगे यांनी मी माजी आमदार योगेश टिळेकर बोलतोय, मी दुसऱ्या मोबाईलवरून फोन केला आहे. एक शेंडगे नामक कोरोनाबाधित रुग्ण आहे. त्याला बेड उपलब्ध करून द्यावा. असे उपायुक्तांना सांगितले. दरम्यानच्या काळात उपायुक्तांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा ज्या क्रमांकावरून फोन आला होता. त्यावर संपर्क केला असता, त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर उपायुक्तांनी हा सर्व प्रकार योगेश टिळेकर यांना सांगितला. त्यामुळे परवानगीशिवाय नाव वापरून पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी शेंडगेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी दिली.