"हॅलो, PM मोदींना मारण्याचा कट आहे"; 'तो' फोन करणारा पोलिसांना सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 02:25 PM2022-10-07T14:25:19+5:302022-10-07T14:27:32+5:30

पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत...

call on police helpline 112 conspiracy to kill PM narendra Modi police found the caller | "हॅलो, PM मोदींना मारण्याचा कट आहे"; 'तो' फोन करणारा पोलिसांना सापडला

"हॅलो, PM मोदींना मारण्याचा कट आहे"; 'तो' फोन करणारा पोलिसांना सापडला

Next

पिंपरी : हॅलो, पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब यांना मारण्याचा कट आहे. मुंबई रेल्वे स्टेशनवर बॉम्ब स्फोट करण्यात येणार आहे, असा कॉल पोलीस हेल्पलाइन ११२ वर आला आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी कॉल करणाऱ्याला ट्रेस करून त्याच्याकडे विचारणा केली असता ही खोटी माहिती असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हा प्रकार मंगळवारी (दि. ४) देहुरोड येथे घडली. या प्रकरणी पोलीस नाईक अशोक वसंत पारधी यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या मनोज अशोक हंसे (रा. विजयनगर, देहुरोड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीचा फोन ट्रेस करून तो जात असलेल्या कारला अडवून त्याने खोटा कॉल का केला, याबाबत विचारणा केली. मात्र, त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक करून तपास केला. त्यावेळी आरोपीचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून, तो तणावाखाली असल्याचे समोर आले. त्यातून त्याने हे कृत्य केले असावे असा अंदाज व्यक्त केला. मोठ्या आवाजानेदेखील आरोपी हायपर होत असल्याचे निरीक्षणदेखील पोलिसांनी नोंदवले.

Web Title: call on police helpline 112 conspiracy to kill PM narendra Modi police found the caller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.