असे होते ‘म्युटेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:01+5:302020-12-23T04:09:01+5:30
असे होते ‘म्युटेशन’ प्रतिकार करणारी शरीरातली यंत्रणा म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी (अँटिजेन प्रेझेंटिंग सेल्स). कोरोना विषाणू शरीरात आल्यानंतर प्रतिकार करणाऱ्या ...
असे होते ‘म्युटेशन’
प्रतिकार करणारी शरीरातली यंत्रणा म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी (अँटिजेन प्रेझेंटिंग सेल्स). कोरोना विषाणू शरीरात आल्यानंतर प्रतिकार करणाऱ्या पेशींसाठी तो नवीन असतो. पण ही प्रतिकार यंत्रणा सक्षम असल्यास विषाणुची वाढ होत नाही. ही यंत्रणा कमजोर असेल तर विषाणुंचे प्रमाण (व्हायरल लोड) वाढत जाते. या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. हा संसर्ग वाढत गेल्यानंतर या प्रक्रियेदरम्यान विषाणू टिकून राहण्यासाठी जनुकीय रचनेत बदल करत असतात. याला ‘म्युटेशन’ म्हणतात.
चौकट
“विषाणुंमधील जनुकीय रचनेतील बदल ही नैसर्गिक व सातत्यपुर्ण प्रक्रिया आहे. त्यात सतत छोटे-मोठे बदल होत असतात. त्यांचे ‘होस्ट’ (संसर्ग होणारे) बदलतात. या बदलांमुळे त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांची तीव्रताही कमी-अधिक असते. हे बदल किती घातक आहेत, त्याच्या जनुकीय रचनेतील बदल, प्रथिनांमधील बदलांच्या अभ्यासावरून सांगता येऊ शकते. तसेच त्यानुसार सध्याची औषधे किंवा लशी किती परिणामकारक ठरू शकतात, हे स्पष्ट होते. फ्यु, इन्फ्लुएन्झाच्या विषाणुंमध्येही सतत बदल होत आले आहेत.”
-डॉ. स्मिता झिंजर्डे, संचालक, इन्स्टिट्युट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स अॅन्ड बायोटेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ