कस्टमर केअरला फोन करणे पडले महागात; बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून ११ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: October 8, 2023 16:18 IST2023-10-08T16:17:53+5:302023-10-08T16:18:34+5:30
चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांक धारकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

कस्टमर केअरला फोन करणे पडले महागात; बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून ११ लाखांची फसवणूक
पुणे : कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या राहणाऱ्या महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ जुलै २०२३ रोजी घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तक्रारदार महिला त्यांच्या बँक ऑफ बरोदाच्या बँक खात्याचे स्टेटमेंट काढत होत्या. स्टेटमेंट निघत नसल्याने त्यांनी गुगलवरून कस्टमर केअर नंबरचा शोध घेतला. गुगलवर नमूद मोबाईल क्रमांकावर फोन केला असता बँक ऑफ बरोदाचे कर्मचारी बोलत असल्याचे भासवून महिलेला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. तक्रारदार महिलेने अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन रिमोट ॲक्सेसद्वारे महिलेच्या बँक खात्यातुन परस्पर १० लाख ९२ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांक धारकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिन निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहेत.