Pune News: आईला भेटायला आला आणि जाळ्यात सापडला, चुहा गँगमधील एक जण जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 14:26 IST2023-12-01T14:26:06+5:302023-12-01T14:26:35+5:30
मोक्का कारवाई टाळण्यासाठी लपून पोलिसांना गुंगारा देणारा, तब्बल एक वर्षापासून फरार, चुहा गँगचा सदस्य आईला भेटायला आला आणि जाळ्यात सापडला सापडला...

Pune News: आईला भेटायला आला आणि जाळ्यात सापडला, चुहा गँगमधील एक जण जेरबंद
धनकवडी (पुणे) : खुनाचा प्रयत्न, जवळ हत्यार बाळगणे, मारामारी या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि मोक्का कारवाई टाळण्यासाठी लपून पोलिसांना गुंगारा देणारा, तब्बल एक वर्षापासून फरार, चुहा गँगचा सदस्य आईला भेटायला आला आणि जाळ्यात सापडला सापडला. भारती विद्यापीठ पोलीसांना त्याला अटक केली आहे. तीफिक लाला शेख, (वय २६ वर्षे, धंदा चालक, रा. १०/३, मांगडेवाडी, भरवनाथ हाईटग, दुसरा मजला, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा या गुन्हयातील तीफीक लाला शेख, मागील एक वर्षापासून ओळख लपवून, नाव बदलून वेगवेगळया जिल्ह्यामध्ये वापरत होता, त्यास पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या सापळ्यातून पोलिसांना गुंगारा देत तो निसटत होता.
दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती. आईला भेटायला येणार असल्याची खात्रीपूर्वक बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून तीफीकला ताब्यात घेतले.