बाल मजुरी विराेधात अभियान ; विविध उपक्रमांचे आयाेजन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 06:21 PM2019-04-30T18:21:17+5:302019-04-30T18:25:15+5:30
बाल हक्क कृती समिती ( आर्क ) तर्फे राष्ट्रीय बालमजुरी विरोध दिन 30 एप्रिल ते जागतिक बाल मजुरी विरोधी दिन 12 जून पर्यंत बालमजूरी विरोधी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : आजही अनेक ठिकाणी लहानमुलांना कामावर ठेवले जाते. अनेकदा त्यांच्याकडून बळजबरीने काम करुन घेतले जाते. बाल हक्क कृती समिती ( आर्क ) तर्फे राष्ट्रीय बालमजुरी विरोध दिन 30 एप्रिल ते जागतिक बाल मजुरी विरोधी दिन 12 जून पर्यंत बालमजूरी विरोधी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानामध्ये स्वाक्षरी माेहीम घेण्यात येणार असून त्याचबराेबर विविध उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. आज पुण्यातील संभाजी बाग परिसरामध्ये बालमजुरी विराेधात स्वाक्षरी माेहीम घेऊन या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तीन प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या. त्यात शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती १८ वर्षापर्यंत वाढवा. १८ वर्षाआतील काम करणाऱ्या ( धोकादायक/ बिना धोकादायक ) प्रत्येक व्यक्तीचा बाल कामगार संज्ञेत समावेश करावा. बालमजुरी प्रतिबंध कायद्यातील कलम तीन काढून टाकावे. ज्यामध्ये कौटुंबिक व्यवसायातील बालकांचा सहभाग कायदेशीर मानले आहे. या मागण्यांचा समाेवश हाेता.
या तीन प्रमुख मागण्या घेऊन वस्तीपातळीवर, शाळांमध्ये तसेच सामान्य नागरिकांमध्ये स्वाक्षरी मोहीम, पथनाट्य आणि पोस्टकार्ड उपक्रमाद्वारे हे अभियान राबविण्यात येत आहे. आर्क व्यासपीठातील हजारो मुलं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या मागण्या मांडणार आहे. आर्क हे बाल हक्कांवर काम करणाऱ्या संस्थाचे व्यासपीठ आहे. बालमजूरी ही अनिष्ठ प्रथा असून बालमजुरीमूळे लाखो मुलांचे बालपण हरवले आहे. या प्रथेचे मुळासकट उच्चटन होणे आवश्यक आहे. ही बालहक्क कृती समितीची भूमिका आहे.