शेलारवाडीत, खामगावात कोरोनामुक्तीसाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:17+5:302021-06-16T04:15:17+5:30
खामगावच्या शेलारवाडीमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली होती. कोरोना झाल्याने ...
खामगावच्या शेलारवाडीमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली होती. कोरोना झाल्याने दुर्दैवाने नऊ जणांना स्वतःचे प्राण गमवावे लागले होते. याचाच विचार करून खामगाव ग्रामपंचायत सदस्य अतुल जगताप व भाजपा व्यापार आघाडी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास जगताप यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याबरोबर संपर्क करून प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव यांच्यामार्फत शेलारवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.
तपासणी शिबिरात ज्यांना सर्दी, खोकला, ताप किंवा कोरोनासदृश लक्षणे असतील, अशा ग्रामस्थांची त्वरित प्राथमिक जिल्हा परिषद शाळा शेलारवाडी येथे ॲन्टिजन टेस्टद्वारे तपासणी केली. या वेळी ४८ ग्रामस्थांची ॲन्टिजन तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे करण्यात आली. यातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. यामध्ये डॉक्टर, सिस्टर्स व आशासेविकांचे विशेष सहकार्य लाभले.