जमाते इस्लामी हिंदचे २२ पासून अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:19+5:302021-01-20T04:12:19+5:30
पुणे : जगात मुस्लिमांविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत, अपप्रचार केला जात आहे. कोरोनामुळे अनेकांना नैराश्य आले आहे. यातून ...
पुणे : जगात मुस्लिमांविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत, अपप्रचार केला जात आहे. कोरोनामुळे अनेकांना नैराश्य आले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तसेच मुस्लिमांसह सर्वच धर्मातील नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी २२ जानेवारीपासून ‘अंधारातून प्रकाशाकडे’ हे राज्यव्यापी अभियान राबवणार असल्याचे जमाते इस्लामी हिंदचे शाखा प्रमुख इम्तियाज शेख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पुस्तके, व्हिडीओ क्लिप, मशिदीविषयक माहिती आणि कुराणाचे इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेत रूपांतर करून या अभियानातून जागृती केली जाणार आहे.
----------
डॉ. सुनंदा राठी यांनी पीएच.डी.
पुणे : बंगळुरू येथील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे कुलगुरू डॉ. एच. आर. नागेंद्र यांच्या हस्ते डॉ. सुनंदा राठी यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. राठी यांना डॉ. पद्मिनी टेकुर, डॉ. नागरत्ना यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------
मानवी अभिहस्तांतरणसाठी मार्गदर्शन
पुणे : सहकार विभाग, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ, हिंजवडी रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन आणि मेगापॉलीस स्प्लेंडर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी अभिहस्तांरणसाठी मार्गदर्शन आयोजित केले आहे.
शनिवारी (दि. २३) रोजी सकाळी साडेदहा वाजता मेगापॉलीस स्प्लेंडर सोसायटी क्लब हाऊस, हिंजवडी फेज ३ येथे तर रविवारी (दि. २४) रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत के. आर. प्लाझा, बालवडकर कॉम्प्लेक्स बाणेर-बालेवाडी रस्ता लक्ष्मी मातानगर बालेवाडी येथे मार्गदर्शन होणार आहे.
----------------
हळदी-कुंकू उत्साहात
पुणे : जनशक्ती विकास संघाच्या वतीने मार्केटयार्ड येथे हळदी-कुंकू आयोजित करण्यात आले. सुमारे २०० महिला यात सहभागी झाल्या. अध्यक्षा छाया भोसले, सौफ अरिफ, फिरोज मुल्ला, सारिखा खान, शम्मी कुरेशी, सिमरन साबळे, प्रणिता राठी, बानू शेख, सायरुन शेख, मुमताज शेख, नागो चांदशिवे, शहबाज शेख यांनी आयोजन केले.