बारामतीत करवसुलीची मोहीम तीव्र

By admin | Published: March 25, 2017 03:39 AM2017-03-25T03:39:20+5:302017-03-25T03:39:20+5:30

नगरपालिकेने थकीत कराच्या वसुलीसाठी मोहीम अधिक तीव्र केली आहे. दररोज थकीत कराचे ५० लाख रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट

The campaign for taxation in Baramati is very intense | बारामतीत करवसुलीची मोहीम तीव्र

बारामतीत करवसुलीची मोहीम तीव्र

Next

बारामती : नगरपालिकेने थकीत कराच्या वसुलीसाठी मोहीम अधिक तीव्र केली आहे. दररोज थकीत कराचे ५० लाख रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ६ वसुली पथकांमार्फत १८० मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली. या मोहिमेंतर्गत बारामती शहरातील रिलायन्स कंपनीचा टॉवर आज सील करण्यात आला.
दोन दिवसांत आणखी १ हजार मिळकतधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. ३१ मार्चनंतर जप्ती मोहीम, स्थावर, जंगम मालमत्ता अटकावून ठेवणे, बँक खाती सील करणे, अशी मोहीम राबविण्यात येणार आहे. मिळकतकराची वसुली मोहीम एप्रिल, मे, जून महिन्यातदेखील सुरू ठेवण्यात येणार आहे. नगरपालिका अधिनियमानुसार कर न भरल्याची शास्ती व अनधिकृत बांधकामावर लागणारी मालमत्ता कराच्या दुप्पट शास्ती रद्द करण्याचा अधिकारी कोणालाही नाही.
या मोहिमेंतर्गत बारामती शहरातील शासकीय कार्यालयाकडे असलेल्या करासाठी सक्तीने वसुली केली जाईल. प्रसंगी शासकीय कार्यालयेदेखील सील केली जातील, असे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The campaign for taxation in Baramati is very intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.