प्रचारावरून प्राणघातक हल्ला; चार जखमी
By admin | Published: October 7, 2014 06:18 AM2014-10-07T06:18:00+5:302014-10-07T06:18:00+5:30
आमचा प्रचार का करीत नाहीस म्हणून अंगावर कार घालून तलवार, काठ्या व हाताने प्राणघातक हल्ला केल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
यवत : आमचा प्रचार का करीत नाहीस म्हणून अंगावर कार घालून तलवार, काठ्या व हाताने प्राणघातक हल्ला केल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यात सचिन बाळासाहेब गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. काल (दि.५) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपी रणजित बाळासाहेब पवार, रूपेश गव्हाणे, मंगेश कैलास ढवळे, आसिफ डाळवाले, राजेंद्र मारुती गव्हाणे, संदीप तुकाराम गव्हाणे, आकाश संभाजी गव्हाणे, रोहन कांबळे, स्वस्तिक बबन गव्हाणे यांनी संगनमत करून बेकायदेशीररीत्या जमाव जमवत ‘तू आमच्या पक्षाचा प्रचार का करीत नाहीस?’ असे म्हणत लाठ्या, काठ्या, तलवार व दगडाने मारहाण केली.
सदर मारहाण सुरू असताना आकाश गव्हाणे याने त्याची कार (क्र.एम.एच.१२, एफ.४१७४) घेऊन येत फिर्यादीच्या आत्याला ठोस मारून गंभीर जखमी केले. तसेच, घरावर दगडफेक करून कारचे नुकसान केले. (वार्ताहर)