परीक्षेच्या ३ तासांत विद्यार्थी पूर्ण पेपर साेडवू शकताे का? याची चाचपणी झाली पाहिजे - शरद गोसावी
By प्रशांत बिडवे | Published: February 29, 2024 05:33 PM2024-02-29T17:33:53+5:302024-02-29T17:34:14+5:30
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपण काही शाळांमध्ये open book exam परीक्षा पध्दतीचा प्रायाेगिक तत्वावर प्रयत्न करू शकताे
पुणे : ओपन बुक एक्साम निश्चितपणे एक चांगला प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपणही काही शाळांमध्ये या परीक्षा पध्दतीचा प्रायाेगिक तत्वावर प्रयत्न करू शकताे. मात्र, परीक्षेच्या तीन तासांत विद्यार्थी पूर्ण पेपर साेडवू शकताे का नाही? याचीही चाचपणी झाली पाहिजे असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी सांगितले.
सीबीएसई तर्फे ओपन बुक एक्साम पध्दतीने परीक्षेचे आयाेजन करण्याबाबत चर्चा सुरू आहे तसेच ही परीक्षा पध्दत राबविण्यासाठी चाचपणी केली जात आहे. राज्य मंडळही ओपन बुक एक्साम चे आयाेजन करणार का ? अशी विचारणा केली असता गाेसावी म्हणाले, सीबीएसई ही परीक्षा पध्दत राबविणार असल्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. किंवा काेणते अधिकृत पत्रही पाहण्यात आले नाही. यासह राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणात ओपन बुक एक्साम हा घटक अंतर्भूत केलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेत पुस्तक साेबत असेल तर आपल्याला उत्तरपत्रिकेत भरपूर लिहिला येईल असे विद्यार्थ्यांना वाटू शकते. मात्र, त्याच्या उलट ही गाेष्ट आहे. पुस्तकात काेणत्या पानावर काय भाग आहे? याबाबत माहिती नसल्याशिवाय विद्यार्थी पूर्ण पेपर लिहू शकणार नाहीत. त्यामुळे तीन तासांत विद्यार्थी उत्तर साेडवू शकतात का नाही? हे पहिल्यांदा तपासावे लागणार आहे.
ओपन बुक एक्साम म्हणजे काय?
विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्नांचे उत्तर लिहिण्यासाठी पुस्तक किंवा वाचन साहित्याचा वापर करण्यासाठी परवानगी दिली जाते. विद्यार्थी पुस्तकातील उतारे, पाठ वाचून उत्तर लिहू शकताे. त्यामुळे कॉपीचे प्रकारावर आळा बसण्यास मदत होते.
ओपन बुक एक्साम निश्चितपणे चांगला प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपणही काही शाळांमध्ये या परीक्षा पध्दतीचा प्रायाेगिक तत्वावर प्रयत्न करू शकताे .- शरद गाेसावी, अध्यक्ष राज्य मंडळ