कॅनॉल रस्ता ते म्हसाडे वस्तीपर्यंतचा शेतरस्ता झाला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:09+5:302021-05-06T04:11:09+5:30

दावडी येथील म्हसाडेवस्तीवरील शेतकऱ्यांना असणारा अनेक वर्षे वादात अडकला होता. शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान व गैरसोयीचा ...

The canal road from the canal road to the Mhasade settlement was opened | कॅनॉल रस्ता ते म्हसाडे वस्तीपर्यंतचा शेतरस्ता झाला खुला

कॅनॉल रस्ता ते म्हसाडे वस्तीपर्यंतचा शेतरस्ता झाला खुला

googlenewsNext

दावडी येथील म्हसाडेवस्तीवरील शेतकऱ्यांना असणारा अनेक वर्षे वादात अडकला होता. शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान व गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच, या ठिकाणी लोकवस्ती असल्याने नागरिकांना जाणे- येणे बंद झाले होते. शेतकऱ्यांना शेतीमाल डोक्यावर बाहेर काढावा लागत असे व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते. या रस्त्यासाठी अनेक वादविवाद होऊन पोलीस ठाण्यात वाद गेला होता. मात्र, या रस्त्यावरून कायम होणारा वाद व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता दावडीचे सरपंच संभाजी घारे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, उपसरपंच राहुल कदम,ग्रामपंचायत सदस्या पुष्पा होरे, माजी उपसरपंच भाऊसो होरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल नेटके, मारुती बोत्रे, बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, रमेश होरे, यांच्या मध्यस्थीने या वस्तीवरील सर्व भाऊबंदांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन ह्या रस्त्याचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी, शेतमाल बाहेर काढण्यासाठी रस्ता मिळाल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत आहे .हा रस्ता खुला झाल्याने ३५० एकर जमीन व २०० शेतकऱ्यांच्या शेतीमालाची दळणवळाची सोय झाली आहे. या रस्त्यासाठी ग्रामपंचायत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे सरपंच आबा घारे यांनी सांगितले.

०५ दावडी

दावडी-म्हसाडे वस्ती ते कॅनॉल रस्ता खुला करून रस्त्याचे काम चालू केले. यावेळी उपस्थित असलेले संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, पोलीस पाटील व शेतकरी

Web Title: The canal road from the canal road to the Mhasade settlement was opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.